खालिस्तानी मुद्द्यावरून कॅनडा आणि भारताचे आरोप- प्रत्यारोप सुरू असताना इतर ठिकाणी खलिस्तानी अतिरेक्यांच्या कुरापती वाढताना दिसत आहेत. अमेरिकेत एका हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थनार्थ आणि भारताच्या विरोधातील मजकूर भिंतीवर लिहिण्यात आला आहे. कॅलिफोर्नियाच्या निवार्क सिटीमधील हा प्रकार आहे. स्वामीनारायण मंदिर संस्थाच्या भींतीवर आपेक्षार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतील हिंदू-अमेरिकेन संस्थेकडून यासंदर्भातील फोटो ‘एक्स’वर शेअर करत माहिती देण्यात आली आहे. फोटोमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आणि स्वतंत्र खलिस्तानचे समर्थन करणारा मजकूर भींतीवर लिहिण्यात आल्याचं दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही या संदर्भात वृत्त दिले आहे.
संस्थेने यासंदर्भात तपासणी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवार्क पोलिसांकडे केली आहे. आवश्यक ती माहिती निवार्क पोलीस आणि नागरी अधिकार विभागाला यासंदर्भात आवश्यक माहिती देण्यात आल्याचं हिंदू-अमेरिकेन संस्थेने सांगितले आहे.
A Hindu temple has been vandalised with anti-India and pro-Khalistan graffiti on its exterior walls in Newark, California, United States. Newark Police has assured a thorough investigation into the incident. pic.twitter.com/ruhEY6nkv1
— ANI (@ANI) December 23, 2023
हिंदू मंदिरावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याचा गैरप्रकार यापूर्वीही अमेरिकेत झालेला आहे. अशा प्रकारच्या घटना अमेरिका आणि शेजारच्या कॅनडामध्ये वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी कॅनडातील सुर्रे सिटीमधील हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी मृत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याचे पोस्टर मंदिर परिसरात लावण्यात आले होते.
हे ही वाचा:
प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन!
बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करणार
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदच्या जागेचा लिलाव!
गुलाल कोणावर उधळला जाणार, हे कोण ठरवणार?
दरम्यान, कॅनडा आणि अमेरिकाचा नागरिक गुरपतवत सिंग पन्नू हा कट्टर खलिस्तानी समर्थक असून तो या दोन देशांमधून भारत विरोधी कारवाई करत आहे. अनेकदा त्याने भारतावर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. पन्नूच्या पंजाबमधील संपत्तीची जप्ती करण्यात आली आहे.