ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ

बॅरिस्टर वरुण घोष भगवतगीतेच्या साक्षीने शपथ घेणारे ऑस्ट्रेलियातील पहिले खासदार

ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ

ऑस्ट्रेलियातील एका खासदाराने पदाची शपथ घेतल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. बॅरिस्टर वरुण घोष यांनी भगवतगीतेच्या साक्षीने शपथ घेतली. बॅरिस्टर वरुण घोष हे भगवतगीतेच्या साक्षीने शपथ घेणारे भारतात जन्मलेले ऑस्ट्रेलियातील पहिले खासदार ठरले आहेत. विधान सभा (लेगेस्लेटिव्ह असेम्बी) आणि विधान परिषदेकडून (लेगेस्लेटिव्ह कॉन्सिल) निवड झाल्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे नवे सेनेटर म्हणून वरुण घोष यांची नियुक्ती झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पार्लमेंटचे ते सदस्य झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेन्नी वोंग यांनी वरुण घोष यांचे संसदेत स्वागत केले. त्या म्हणाल्या की, “लेबर सिनेट टीममध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचे स्वागत. नवे सिनेटर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आहेत. भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे घोष हे पहिले ऑस्ट्रेलियन सिनेटर आहेत. जेव्हा तुम्ही पहिले असता, तेव्हा तुम्ही कधीच शेवटचे नसता याची खात्री करावी.”

हे ही वाचा:

‘काँग्रेसने नेतृत्वासाठी नेहरू-गांधी यांच्याशिवाय विचार करावा’

‘आरक्षणाच्या लाभार्थींना त्यातून बाहेर काढले पाहिजे’

पेपरफुटी आणि बनावट प्रश्नपत्रिकांना रोखणारे विधेयक लोकसभेत मंजूर!

काँग्रेस नेते, माजी मंत्री हरकसिंह रावत ईडीच्या रडारवर

सिनेटर घोष हे आपल्या समूदायाचा आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या लोकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवतील याची मला खात्री आहे, असंही पेन्नी वोंग म्हणाल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनिज (Anthony Albanese) यांनी देखील वरुण घोष यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी वरुण घोष यांचे स्वागत करत म्हटले आहे की, नवे सिनेटर आमच्या टीममध्ये येणे ही चांगली गोष्ट आहे.

Exit mobile version