बांगलादेशातील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून मंदिर पेटवले

हिंसाचारादरम्यान आंदोलकांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य

बांगलादेशातील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून मंदिर पेटवले

बांगलादेशामधील अराजकेतनंतर तेथील हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बांगलादेशच्या खुलना विभागात असलेल्या मेहेरपूरमधील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून मंदिराला आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतरही देशात अशांतता पसरली असून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

हिंसाचारादरम्यान आंदोलकांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात येत आहे. इस्कॉन मंदिरावरील हल्ला हा याचं हिंसाचाराचा भाग आहे. गेल्या २४ तासांत बांगलादेशातील अनेक हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंदा दास यांनी या मंदिर तोडफोडीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, “मला मिळालेल्या माहितीनुसार, मेहेरपूरमधील आमचे इस्कॉन केंद्र भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी यांच्या देवतांसह जाळण्यात आले. मंदिरात तीन भाविक राहत होते पण ते त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा जीव वाचला आहे.”

हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन युनिटी कौन्सिलच्या नेत्या काजोल देबनाथ यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, सोमवारी किमान चार हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. मंदिराचे किरकोळ नुकसान यात झाले आहे. मंदिरावरील हल्ल्यांव्यतिरिक्त, ढाका येथील भारतीय सांस्कृतिक केंद्राचीही जमावाने तोडफोड केली. भारत आणि बांगलादेश दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण करणाऱ्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे या हिंसाचारात नुकसान झाले.

हे ही वाचा:

मूकबधिर तरुणांनीच केली मूकबधिर तरुणाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये

भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !

गिरगावात भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बांगलादेशातील सत्तापालटानंतर बीएसएफकडून सर्व सीमेवर ‘हाय अलर्ट’

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेश पेटून उठला आहे. आरक्षणाविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून संपूर्ण देश पेटून उठला आहे. दरम्यान, बांगलादेशची सत्ता सध्या लष्कराच्या हाती आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी अंतरिम सरकार स्थापन केले जाईल आणि हिंसाचार थांबविण्याचे आवाहन निदर्शकांना केले आहे.

Exit mobile version