इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान पाकिस्तानमध्ये पोहचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे भरकटून पाकिस्तानात पोहचले मात्र नंतर हे विमान भारतात सुखरूप परतले.
फ्लाईट रडारनुसार, ४५४ नॉट इतका वेग असलेले एक भारतीय विमान शनिवार, १० जून रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास लाहोरच्या उत्तरेकडे शिरले. पुढे रात्री ८ वाजून १ मिनिटांनी हे विमान भारतात परतले, असे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले आहे. भरकटलेले विमान लाहोरनजिक गेले आणि गुजरानवालापर्यंत जाऊन सुखरूप भारतीय हद्दीत परत आले. इंडिगो एअरलाइन्सने यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. खराब वातावरणाच्या परिस्थितीत या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता असल्यामुळे ही असाधारण गोष्ट नाही, असे नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे या वृत्तात नमूद केले आहे.
हे ही वाचा:
गेमिंग ऍप धर्मांतरण प्रकरणी फरार शाहनवाजला पकडले
सतत रडणे,गप्प गप्प राहणे; ओडिशा अपघातातील जखमी मनोविकाराने ग्रस्त
ऑस्ट्रेलियाने जिंकले पहिले कसोटी अजिंक्यपद
ठीक वर्षापूर्वी मविआची भाकरी करपली होती, आज अजित पवारांची करपली!
मे महिन्यात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) एक विमान असेच भारतीय हद्दीत शिरले होते. पाकिस्तानातील प्रचंड पावसामुळे सुमारे १० मिनिटे तेथेच थांबले होते. पीके २४८ हे विमान ४ मे रोजी मस्कतहून परतत असताना लाहोरच्या अलामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, मुसळधार पावसामुळे वैमानिकाला हे बोइंग ७७७ विमान उतरवणे कठीण झाले होते. तेव्हा ते भारतीय हद्दीत आले होते.