बौद्ध धर्माचे वरिष्ठ नेते दलाई लामा यांनी तिबेटच्या नव्या धर्मगुरूचा शोध पूर्ण केला आहे. आता तिसरा धर्मगुरू म्हणून त्यांनी एका आठ वर्षीय मुलाची निवड केली आहे.
अमेरिका स्थित मंगलोई मुलाला तिब्बती बौद्ध धर्माच्या तिसरा सर्वात अशा महत्वपूर्ण अध्यात्मिक नेत्याच्या रूपामध्ये नामांकित करण्याचे ठरविले आहे. जवळपास ६०० मंगोलियन लोक या नव्या अध्यात्मिक नेत्याचा जल्लोष करण्यासाठी जमले होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ८७ वर्षीय दलाई लामा हे आठ वर्षीय मुलाला लाल वस्त्र आणि मुकुट परिधान करताना आहेत. मंगोलियन मीडिया प्रमाणे हा मुलगा जुळ्या मुलांपैकी एक असून या मुलाला दहावे खलखा जेटसन धम्पा रिनपोछे यांचा पुनर्जन्म असल्याचे मानले जात आहे.
बौद्ध धर्मात पुनर्जन्माला विशेष महत्व आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे धर्मगुरूंच्या पुनर्जन्माचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ६०० मंगोलियन लोक जमले होते. दलाई लामा यांचे वास्तव्य सुद्धा येथेच असते. या मुळे मंगोलिया देशाचे शेजारील राष्ट्र चीन यामुळे भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. २०१६ साली दलाई लामा यांनी मंगोलिया देशाचा दौरा केला होता. त्यावेळेस चीनने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
हे ही वाचा:
वैभव मांगले म्हणतोय ‘भय इथले संपत नाही!’
खलिस्तानींच्या हल्ल्यांविरोधात भारताने कॅनडा सरकारला ठणकावले!
करतारपूर साहिबला भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर पाकिस्तानची शुल्क सक्ती
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची ‘पासिंग आऊट परेड’
दलाई लामा यांच्या दौऱ्यामुळे मंगोलिया आणि चीन यांच्या संबंधावर नकारात्मक परिणाम झाला असून चीनने त्यावर टीका केली होती. दलाई लामा यांनी म्हंटले आहे कि, तिबत्ती बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्वपूर्ण लामा, जेटसन धम्पा यांचा मंगोलियात पुनर्जन्म झाला होता. त्यांची अनेक दिवसांपासून शोध मोहीम सुरु होती. मीडिया मधून त्यांना कळले कि, मंगोलियन बालक अगुईदई आणि अचिलटाई अल्तानार नावाच्या जुळ्या बालकांपैकी एक बालक आहे. पण या दोघांपैकी कोण आहे याची माहिती अजूनही उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होत आहे.