व्याभिचारी महिलेला सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचून मारणार

तालिबान प्रमुखाचा इशारा

व्याभिचारी महिलेला सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचून मारणार

मुलींच्या शिक्षणावर बंधन आणल्यानंतर तालिबानने आता व्याभिचाराबाबत महिलांना इशारा दिला आहे. व्याभिचार करणाऱ्या महिलांना लोकांसमोर जाहीरपणे फटके दिले जातील आणि तिला दगडाने ठेचून मारले जाईल, असा इशारा तालिबानचा प्रमुख मुल्लाह हिबतुल्लाह अखुंदझदा याने दिला आहे. तालिबान पुन्हा अफगाणिस्तानला काळ्या युगात नेईल, ही भीती आता खरी ठरू लागली आहे.

एका ऑडिओ मेसेजद्वारे हा संदेश देण्यात आला. तसेच, त्याने पाश्चिमात्य देशांतील लोकशाहीविरोधात सातत्याने लढण्याचा निर्धारही व्यक्त केल्याचे वृत्त टेलिग्राफने दिले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने समर्थित केलेले महिलांचे अधिकार आणि तालिबान ज्या कायद्याची अंमलबजावणी करते, त्या इस्लामच्या शरियत कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आहेत. ‘पाश्चिमात्य ज्या अधिकारांबद्दल बोलत आहेत ते अधिकार महिलांना हवे आहेत का? ते शरिया आणि धर्मोपदेशकांच्या मतांच्या विरोधात आहेत, ज्यांनी पाश्चिमात्य लोकशाहीचा पाडाव केला,’ असे अफगाणिस्तानच्या तालिबान प्रमुखाने स्पष्ट केले.

‘मी मुजाहिदीनांना सांगितले की, आम्ही पाश्चात्य लोकांना सांगतो की, आम्ही तुमच्या विरोधात २० वर्षे लढलो आणि आम्ही आणखी २० वर्षे आणि आणखी वर्षे लढू. ते (तुम्ही निघाल्यावर) हे पूर्ण होऊ शकले नाही. याचा अर्थ आता आम्ही नुसते बसून चहा पिऊ असे नाही. आम्ही या भूमीवर शरिया आणू. आम्ही काबूल ताब्यात घेतल्यानंतर हे होऊ शकले नव्हते. मात्र आम्ही आता शरिया कृतीत आणू,’ असे वृत्त टेलीग्राफने अखुंदजादाच्या हवाल्याने दिले आहे.

हे ही वाचा:

भारतीय नौदलाचा पुन्हा चाच्यांशी संघर्ष; अपहृत जहाजावरील २३ पाक कर्मचाऱ्यांची सुटका

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

“मविआमधून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला”

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

‘तुम्ही म्हणता की जेव्हा आम्ही त्यांना दगड मारून ठार मारतो तेव्हा हे महिलांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. परंतु आम्ही लवकरच व्यभिचाराची शिक्षा लागू करू. आम्ही महिलांना सार्वजनिकपणे फटके मारू. आम्ही त्यांना सार्वजनिक ठिकाणी दगड मारून ठार करू,’ अखुंदजादा यांनी आठवड्याच्या शेवटी सरकारी टेलिव्हिजनवर प्रसारित केलेल्या व्हॉईस मेसेजमध्ये पाश्चात्य देशांना हे ठणकावून सांगितले आहे. ही कृती इस्लामिक कायद्याची अंमलबजावणी असून स्त्रियांच्या हक्कांबद्दलच्या पाश्चात्य कल्पनांना झिडकारणे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

Exit mobile version