अमरूल्ला सालेह झाले अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती! पण कसे?

अमरूल्ला सालेह झाले अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती! पण कसे?

अफगाणिस्तानमधील परिस्थितीने आता नवे वळण घेतले आहे. कारण अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती असणाऱ्या अमरूल्ला सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केले आहे. अफगाणिस्तानाचे राष्ट्रापती अशरफ घनी ह्यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर सालेह यांनी ही घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी अफगाणिस्तानच्या संविधानीक तरतूदींचा दाखला दिला आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी उन्माद फोफावल्यामुळे देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अशा कठीण परिस्थितीत देशातील नागरिकांची जबाबदारी घेत तोडगा काढण्याचे सोडून अफगाणिस्तानचे राष्ट्रप्रमुख अशरफ घनी यांनी देशातून पलायन केले आहे. पण आता अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरूल्ला सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केल्यामुळे या सर्व प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. सालेह यांनी अफगाण संविधानाचा दाखला देत स्वतःला काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केले आहे.

हे ही वाचा:

पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट

विवेक पाटीलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त

आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?

अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

अफगाणिस्तानच्या संविधानातील तरतूदींनुसार जर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती यांचा अकाली मृत्यू झाला, त्यांनी राजीनामा दिला किंवा ते काही कारणास्तव अनुपस्थित असतील अथवा पळून गेले असतील तर त्यांच्या कार्यकाळातील पहिल्या उपराष्ट्रपतींना काळजीवाहू राष्ट्रपती बनवले जाते. त्याच अधिकाराने आपण आता अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती असल्याचे अमरूल्ला सालेह यांनी घोषित केले आहे. कारण सालेह हे अशरफ घनी यांच्या सरकारमध्ये पहिले उपराष्ट्रपती म्हणून कारभार पाहात होते.

ट्विटरच्या माध्यमातून सालेह यांनी ही घोषणा केली आहे. ‘मी सध्या देशातच असून अधिकृत काळजीवाहू राष्ट्रपती आहे. मी सर्व नेत्यांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा आणि मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.’ असे ट्विट सालेह यांनी केले आहे.

Exit mobile version