खलिस्तानी दहशतवादी अमृतपालचा हस्तक खांडा लंडनमध्ये मृत

अमृतपाल सिंगला मार्च ते एप्रिल दरम्यान ३७ दिवस पोलिसांना चकवा देत फरार होण्यास खांडाने मदत केली होती.

खलिस्तानी दहशतवादी अमृतपालचा हस्तक खांडा लंडनमध्ये मृत

खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) चा इंग्लंड स्थित प्रमुख आणि खलिस्तानी फुटीरतावादी अमृतपाल सिंगचा मुख्य हस्तक अवतार सिंग खांडा याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खांडा, ज्याने अमृतपाल सिंगला मार्च ते एप्रिल दरम्यान ३७ दिवस पोलिसांना चकवा देत फरार होण्यास मदत केली होती, त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र हाती आलेल्या वैद्यकीय नोंदीनुसार तो ब्लड कॅन्सरने ग्रस्त असल्याचे म्हटले आहे.

१९ मार्च रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या आंदोलनादरम्यान भारताचा राष्ट्रध्वज खाली पाडण्यामागे बॉम्ब तज्ञ असलेला हा खांडा मास्टरमाईंड होता. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) खांडा आणि इतर तीन फुटीरतावाद्यांना या घटनेमागचे मुख्य आरोपी म्हणून निश्चित केले होते.

हे ही वाचा:

वरिष्ठांचा त्रास; आत्महत्येआधी दलित युवकाने केली पोस्ट

एमपीएलचा रणसंग्राम आजपासून रंगणार! ऋतुराज आणि केदार आमनेसामने

हैदराबादच्या तरुणीची लंडनमध्ये ब्राझिलियन व्यक्तीकडून घरातच हत्या 

संजय राऊत धमकीप्रकरणात पाचवी अटक; सुनील राऊत यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे खळबळ

अनेक वर्षांपूर्वी ठार झालेला KLF दहशतवादी कुलवंत सिंगचा खांडा हा मुलगा आहे. २०१२ मध्ये इंग्लंड येथे आश्रय घेण्यापूर्वी तो २००७ मध्ये स्टडी व्हिसावर इंग्लंडला गेला होता. जानेवारी २०२० मध्ये पाकिस्तानात केएलएफचा माजी प्रमुख हरमीत सिंगच्या हत्येनंतर खांडा ‘रणजोध सिंग’ या टोपण नावाखाली KLF चे नेतृत्व करत होता.  

दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंग यांना वारिस पंजाब देचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात हर्मिट सिंग याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ३७ दिवस फरार असलेल्या अमृतपाल सिंगने २३ एप्रिल रोजी पंजाबमधील मोगा येथील गुरुद्वारात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याला आसामच्या दिब्रुगड तुरुंगात हलवण्यात आले, जेथे पापलप्रीत सिंगसह त्याचे आठ साथीदार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत बंदी म्हणून ठेवण्यात आले आहेत.

Exit mobile version