29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरक्राईमनामासुंजवान आर्मी कॅम्प दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अमीर हमजाची पाकिस्तानात हत्या

सुंजवान आर्मी कॅम्प दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अमीर हमजाची पाकिस्तानात हत्या

अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केली हत्या

Google News Follow

Related

पाकिस्तानी लष्कराचा निवृत्त ब्रिगेडियर आणि आयएसआयचा एक प्रमुख अधिकारी अमीर हमजा याची सोमवारी उशिरा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हमजा भारताविरुद्ध आयएसआयच्या नेतृत्वाखालील कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती होती. जम्मू-काश्मीरमधील सुंजवान आर्मी कॅम्पवर २०१८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते. १२ पेक्षा अधिक जवान जखमी झाले होते. सुंजवान हल्ल्यात सहभागी झालेला तो दुसरा पाकिस्तानी आहे ज्याचा खात्मा करण्यात आला आहे.

पंजाबमधील झेलम जिल्ह्यात हा हल्ला झाला. हमजाच्या कारवर मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञातांनी हल्ला केला. कार झेलममधील लिला इंटरचेंजवर पोहोचली होती तेव्हा दोन दुचाकींवरील चौकडीने त्याला दोन्ही बाजूंनी घेरले आणि गोळीबार केला, असे पाकिस्तानी माध्यमांनी सांगितले. झेलम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्यांचे लक्ष्य ठार झाल्याची खात्री करून अंदाधुंद गोळीबार केला.

पाकिस्तानातील एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने सांगितले की, हल्ला झाला तेव्हा हमजाचा भाऊ अयुब हा हल्ल्याचा साक्षीदार होता कारण तो त्याच्या भावाच्या गाडीमागेच दुचाकीवरून जात होता. तो तक्रारदार असला तरी तोही पोलिसांच्या चौकशीत आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या रेस्क्यू पथकाने निवृत्त ब्रिगेडियरचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची आणि पत्नी, मुलगी जखमी झाल्याची पुष्टी केली आहे.

हे ही वाचा..

भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची लवकरच घोषणा

‘मोदीजी धमक्यांना घाबरणार नाहीत’

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता खात्यात जमा!

गेल्या नोव्हेंबरमध्ये, याच हल्ल्यात सामील असलेला आणखी एक दहशतवादी मारला गेला होता. लष्कर कमांडर ख्वाजा शाहिद उर्फ ​​मियाँ मुजाहिद हा मुख्य सूत्रधार होता. पीओकेमध्ये नियंत्रण रेषेजवळ त्याचे शीर कापलेले आढळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमजाची पत्नी आणि मुलगीही त्याच्यासोबत कारमध्ये होती. त्यांना दुखापत झाली आहे. ठार झालेल्या आयएसआय एजंटचे कोणाशीही वैयक्तिक वैर नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. हे टार्गेट किलिंग असल्याचं पाकिस्तानी पोलिसांनी म्हटलं आहे.

आयएसआय प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित पाकिस्तानी दहशतवादी भारतात सातत्याने मारले जात आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, आयएसआयचा एक प्रमुख कार्यकर्ता आणि कडक सुरक्षारक्षक आमिर सरफराजची लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली होती. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर अदनान अहमद उर्फ ​​अबू हंझाला याचीही अज्ञातांनी डिसेंबरमध्ये कराचीमध्ये हत्या केली होती.जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहिद लतीफ हा 2016 मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणाऱ्या फिदायन पथकाचा मुख्य ऑपरेटर होता. ऑक्टोबरमध्ये सियालकोटमधील एका मशिदीत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा