नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श करणाऱ्या गायिकेने व्यक्त केला मोदींवर विश्वास

अमेरिकी गायिकेचा मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींना पाठिंबा

नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श करणाऱ्या गायिकेने व्यक्त केला मोदींवर विश्वास

अमेरिकी गायिका मेरी मिलबेन यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले आहे. मोदी नेहमीच ईशान्येकडील राज्यातील लोकांसाठी लढतील, असा विश्वास मेरी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर काही वेळेतच मेरी यांचे ट्वीट आले आहे. तसेच, त्यांनी विरोधकांवरही सडकून टीका केली. विरोधकांच्या अशा भूमिकेमुळे भारताची परदेशात मानहानी होते, असा आरोपही त्यांनी केला.

 

‘सत्य हेच आहे की, भारताचा त्यांच्या नेत्यावर विश्वास आहे. मणिपूरमधील माता, मुली आणि महिलांना, भारताला न्याय मिळेल आणि पंतप्रधान मोदी तुमच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच लढतील,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे. ‘विरोधक कितीही मोठ्या आवाजात आरडाओरडा करू देत. परंतु सत्य हेच आहे की, सत्य हेच लोकांना मुक्त करेल. डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘स्वातंत्र्याची गाज ऐकू द्या. माझ्या प्रिय भारतीयांनो, सत्याची गाज ऐकूया. पंतप्रधान मोदी, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करते,’ असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

एअर इंडियाचा नवीन लोगो, नवीन रंगसंगती

देशाची माफी मागा! विरोधकांवर ज्योतिरादित्यांचा घणाघात

बीडमध्ये सिगारेटचे पाकीट महाग दिल्याने हॉटेलवर गोळीबार !

इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे

पुरस्कारविजेत्या आंतरराष्ट्रीय गायिका मेरी मिलबेन यांनी या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका दौऱ्यादरम्यान भेट घेतली होती. त्यांनी भारताचे राष्ट्रगीत जनगनमन गायल्यानंतर मोदी यांचे चरणस्पर्शही केले होते.

Exit mobile version