अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांनी छेडले ‘स्वदेशी’ सूर

अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांनी छेडले ‘स्वदेशी’ सूर

अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकन नौदलाचे चार अधिकारी हे गाताना दिसत आहेत आणि ते पण इंग्रजी नव्हे तर हिंदी भाषेतले गाणे. हे गाणे बॉलीवूडचा सुपरस्टार किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या प्रसिद्ध चित्रपाटातले आहे. शाहरुखच्या स्वदेश या चित्रपटातील ‘स्वदेस हे तेरा’ हे गाणे म्हणत अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

शनिवारी भारताचे अमेरिकेतील राजदूत तरंजीत सिंह सिंधू आणि अमेरिकेचे नौदल प्रमुख मायकल गिल्डवे यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही अधिकाऱ्यांची अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. हिंद महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रात भारत-अमेरिका या दोन देशांचे नौदल मुक्तपणे कार्यरत असेल असे यावेळी अमेरिकेच्या नौदल प्रमुखांनी ट्विट करत सांगितले. “आम्हा दोन्ही देशांच्या नौदलातील समन्वय असाच पुढे चालू राहील” असे देखील अमेरीकी नौदल प्रमुखांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

कथित शाह-पवार भेटीने महाविकास आघाडीत खळबळ

ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत राज्यात होळीचा उत्साह

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक

याच भेटी दरम्यान अमेरिकेच्या नौदलातील काही अधिकाऱ्यांनी भारतीय राजदूतांसमोर हिंदीतून गाणे सादर केले. भारताचे राजदूत तरंजीत सिंह सिंधू यांनी ट्विटरवर हा गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता!’ असे लिहित त्यांनी भारत अमेरिकेच्या मैत्रीचे बंध कधीही तुटणार नाहीत असे म्हटले आहे.

Exit mobile version