पंतप्रधान मोदींच्या या विधानाचे अमेरिकेनेही केले कौतुक

जी २० च्या संयुक्त घोषणापत्रात समावेश

पंतप्रधान मोदींच्या या विधानाचे अमेरिकेनेही केले कौतुक

व्हाईट हाऊसने युक्रेन-रशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आज युद्धाचे युग नाही असा संदेश दिला होता. हा संदेश देण्यामध्ये पंतप्रधानांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे विधान इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी २० शिखर परिषदेच्या संयुक्त घोषणेच्या निकालाचा एक भाग बनले आहे. या विधानाचा जी २० च्या संयुक्त घोषणापत्रात समावेश करण्यात आला आहे.

व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, अमेरिकेची जी २० शिखर परिषद यशस्वी झाली . राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली. शिखर परिषदेच्या घोषणेची वाटाघाटी करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. आजचे युग युद्धाचे नसावे, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. युक्रेन-रशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सप्टेंबरमध्ये समरकंद येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेच्या अन्य एका द्विपक्षीय बैठकीत पुतीन यांच्याशी बोलताना मोदी यांनी आज युद्धाचे युग नाही असे विधान केले होते.

हे ही वाचा : 

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

राहुल गांधींनी शेगावमध्ये सावरकरांबद्दल बोलणे टाळले

पंंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच जी २० शिखर परिषदेत सहभागी होऊन परतले आहेत. राजनैतिक दृष्टिकोनातून त्यांचा दौरा यशस्वी मानला जात आहे. अमेरिकेने ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले त्यावरूनही हे बऱ्याच अंशी स्पष्ट होते. इंडोनेशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी २० शिखर परिषदेच्या बाली घोषणेवर वाटाघाटी करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. आजचे युग युद्धाचे नसावे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

Exit mobile version