जगासाठी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटलिजन्स पण माझ्यासाठी एआय म्हणजे अमेरिका- भारत अशी एक भावना असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत एका कार्यक्रमात लोकांना संबोधन करतना केले आहे. अमेरिका- भारत ही नवीन जगाची एआय शक्ती आहे आणि ती भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंचीवर नेणारी आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून न्यूयॉर्कच्या नासाऊ कोलिझियममध्ये जमलेल्या भारतीयांच्या मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जगासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, पण माझ्यासाठी एआय म्हणजे अमेरिका- भारत. ही नवीन एआय शक्ती आहे,” नरेंद्र मोदींनी हा नवीन अर्थ जनतेला सांगितला.
यावेळी नरेंद्र मोदींनी अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांचं कौतुक केलं. तुम्ही लोकांनी भारताचे नाव उंचावले आहे. तुम्ही सर्वजण भारताचे ब्रँड अम्बेसेडर आहात. भारतमातेने जे आपल्याला शिकवलं ते आपण कधीच विसरू शकत नाही. तुम्ही भारताला अमेरिकेशी आणि अमेरिकेला भारताशी कनेक्ट केलं आहे म्हणूनच मी तुम्हाला राष्ट्रदूत म्हणतो, असं पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांच्या प्रतिभा आणि कौशल्याचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, “तुम्ही भारताला अमेरिकेशी आणि अमेरिकेला भारताशी जोडले आहे. तुमच्या कौशल्य, प्रतिभा आणि वचनबद्धतेला कोणतीही स्पर्धा नाही. तुम्ही सात समुद्राच्या अंतरावर आला असाल तरी कोणत्याही समुद्रात इतकी खोली नाही जी तुम्हाला भारतापासून दूर करू शकेल. भारत मातेने काय शिकवले आहे की कुठेही गेलो तरी तिकडची विविधता समजून घेत ती विविधता जगणे आणि हे आम्ही कधीही विसरू शकत नाही.”
हे ही वाचा :
आरडाओरडा करणाऱ्या न्यायाधीशाला बडतर्फ करण्याची मागणी
तिकिटासाठी इच्छुक सपा खासदाराच्या मुलावर मारहाण-अपहरण प्रकरणी गुन्हा !
दहशतवादाचा नवा पॅटर्न ‘रेल जिहाद’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत झालेल्या आयसीसी वर्ल्ड टी- २० स्पर्धेचाही उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, “अलीकडेच, अमेरिकेने टी- २० विश्वचषकाचे आयोजन केले होते आणि अमेरिकेच्या संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि येथे राहणाऱ्या भारतीयांनी त्यात मोठा सहभाग घेतला, जो संपूर्ण जगाने पाहिला.”