हुती गटाच्या हल्ल्याला अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर!

हूतीकडून हल्ले सुरुच राहिले तर अमेरिकासुद्धा जोरदार प्रत्युत्तर देईल, व्हाइट हाऊस अधिकारी जॉन किर्बी

हुती गटाच्या हल्ल्याला अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर!

अमेरिकेची येमेनमधील हुती विद्रोही गटाविरोधात जोरदार कारवाई अजूनही सुरूच आहे. बुधवारी रात्री अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा विद्रोहींच्या तळांवर जोरदार बॉम्बवर्षाव केला. याआधी हुती गटाने अमेरिकेच्या एका मालवाहू जहाजावर ड्रोनहल्ला केला होता. त्याला अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले. जोपर्यंत हा गट सागरी जहाजांवर हल्ला करेल, तोपर्यंत अमेरिकेची कारवाई सुरूच राहील, असे मंगळवारीच व्हाइट हाऊसने स्पष्ट केले होते.

हुतीने अमेरिकी जहाजाला केले लक्ष्य
अदन खाडीपासून जवळपास ७० मैल अंतरावरील दक्षिण पूर्व भागात हुती ड्रोन अमेरिकेच्या जहाजावर धडकले होते. या ड्रोनच्या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली होती. अर्थात ही आग वेळेत बुजवण्यात आली. जहाज आणि चालक दोन्ही सुरक्षित आहेत, अशी माहिती मध्यपूर्व जलमार्गांची देखरेख करणाऱ्या ब्रिटिश नौदलाच्या यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने बुधवारी दिली.

हे ही वाचा:

धावपट्टी परिसरात प्रवाशांची पंगत; इंडिगोला एक कोटी २० लाखांचा तर, मुंबई विमानतळाला ९० लाखांचा दंड!

पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…

आदित्य ठाकरेंना झटका, निकटवर्तीय सूरज चव्हाणला अटक

राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!

थंडी वाजल्यामुळे पठ्ठ्याने थेट ट्रेनमध्येच शेकोटी पेटवली!

अमेरिकेला दिली धमकी
हुतीच्या सैन्याचा प्रवक्ता ब्रिगेडियर जनरल याह्या साडी याने ते जहाज जेनको पिकार्डीचे असल्याचे स्पष्ट केले होते. एका जुन्या व्हिडीओत त्याने स्पष्ट केले होते की, अमेरिकेच्या हल्ल्याचे उचित प्रत्युत्तर दिले जाईल. पिकार्डीचा मालक अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात राहतो.

अमेरिका यापुढेही हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार
या हल्ल्याच्या एक दिवस आधीच व्हाइट हाऊसकडून इशारा देण्यात आला होता. हूतीने पुढेही हल्ले करणे सुरूच ठेवले तर अमेरिका त्यांना जोरदार प्रत्युत्तर देईल, असे व्हाइट हाऊसचे अधिकारी जॉन किर्बी यांनी स्पष्ट केले होते. ‘आम्हाला माहीत आहे की, त्यांच्याकडे सैन्यशक्ती आहे. आता या ताकदीचा वापर ते कसा करतात, याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल. जर ते हल्ले सुरूच ठेवतील, तर आम्हीही जोरदार प्रत्युत्तर देतच राहू,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

Exit mobile version