भारतात फरार घोषित करण्यात आलेला आरोपी आणि इस्लामचा प्रचारक झाकीर नाईक अलीकडेच पाकिस्तानी YouTuber सोबत पॉडकास्टमध्ये दिसला. नेहमीप्रमाणे यावेळी त्याने तत्थ्यांचा विपर्यास करुन विविध दावे केले, त्यापैकी एक म्हणजे भारतातील नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा प्रसिद्ध अँटिलिया बंगला ज्या जमिनीवर बांधला आहे ती वक्फ मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानी YouTuber सोबतच्या पॉडकास्टमध्ये झाकीर नाईक यांनी दावा केला की, कलम 370 हटवण्यापूर्वी मोदी सरकारने झाकीर नाईक यांना भेटण्यासाठी मलेशियाला आपला एक प्रतिनिधी पाठवला होता, त्यांना झाकीर नाईक यांनी अनुच्छेद 370 हटविण्याच्या निर्णयाचे समर्थन करावे अशी त्यांची इच्छा होती. झाकीर नाईकवर भारतातील दहशतवादी संघटनांशी संबंध, तरुणांना इस्लामी कट्टरतेच्या मार्गला लावणं आणि समाजात द्वेष पसरवण्याचे गंभीर आरोप आहेत. सोबतच झाकीरच्या भारतविरोधी गतिविधींमुळे भारत सरकारने त्याला कायद्यानुसार गुन्हेगार मानले आहे. अशा परिस्थितीत झाकीरशी संपर्क साधण्यासाठी पीएम मोदींनी मलेशियाला प्रतिनिधी पाठवल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
यह भी पढें:
आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
शब्द बदलले पण अर्थ तोच! पुन्हा एकदा शीखांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचे ट्विट
लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान
झाकीर नाईकने या मुलाखतीत कबूल केले की, लष्कर आणि रेल्वेनंतर भारतात सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे, पण त्यांने इथे ही तथ्यांचा विपर्यास केला आहे. मोदी सरकार वक्फमधील काही अनागोंदीचा फायदा घेऊन जमीन हडप करून सरकारकडे जमा करण्याच्या बेतात असल्याचा दावा झाकीरने केला. त्यासाठीच नवीन वक्फ कायदा आणण्यात आला आहे. यादरम्यान, जगातील सर्वात महागडे अँटिलिया घरही वक्फ जमिनीवर बांधल्याचा दावा त्यांनी केला आहे. झाकीर नाईक यांनी कोणतेही पुरावे नसताना केवळ अशी विधाने करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम समाजासाठी वक्फ मालमत्तेचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असू शकते, परंतु नाईक यांनी कोणत्याही पाठिंब्याशिवाय अंबानींसारख्या बड्या उद्योगपतींशी संबंध जोडून मीडियाचे मथळे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.