30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरदेश दुनियाचिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

नोबल शांतता पुरस्काराच्या यादीत तब्बल ३४३ उमेदवारांचा समावेश आहे. ज्यात २५१ व्यक्ति आणि ९२ सामाजिक संघटना आहेत. नोबेल समितीकडून अजून नोबेल शांतता पुरस्कारासाठी नावाची घोषणा केलेली नाही.

Google News Follow

Related

अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर आणि प्रतीक सिन्हा यांना सन २०२२ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे, जून महिन्यात मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक केली होती. याप्रकरणी जुबेर एक महिना तुरुंगात होते त्यांच्यावर खटलादेखील सुरु आहे.

टाईम्सने सन २०२२ च्या नोबेल शांतता पुरस्काराचे वृत्त दिले आहे. नोबेल शांतता पुरस्कार २०२२ विजेत्यांची घोषणा ओस्लो येथे ७ ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. मोहम्मद जुबैर आणि प्रतीक सिन्हा अल्ट न्यूज नामक संकेतस्थळ चालवतात जे समजमाध्यमांवर पसरवण्यात येणाऱ्या बनावट बातम्यांचे तथ्य तपासून पाहतात.

यावर्षी नोबल शांतता पुरस्काराच्या यादीत तब्बल ३४३ उमेदवारांचा समावेश आहे. ज्यात २५१ व्यक्ति आणि ९२ सामाजिक संघटना आहेत. नोबेल समितीकडून अजून नोबेल शांतता पुरस्कारासाठी नावाची घोषणा केलेली नाही. याबाबत माध्यमे किंवा सदस्यांनाही याबाबत माहिती दिलेली नाही. सिन्हा आणि झुबेर यांच्या व्यतिरिक्त, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की, यूएन निर्वासित एजन्सी, पर्यावरणवादीग्रेटा थनबर्ग, पोप फ्रान्सिस, तुवालूचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे आणि म्यानमारचे राष्ट्रीय एकता सरकार हे नॉर्वेजियन खासदारांनी नामांकनामध्ये समावेश असल्याचे आढळले आहे.

दरम्यान, २०१८ मध्ये मोहम्मद जुबेरने एक वादग्रस्त ट्विट केले होते. याप्रकरणी या वर्षी जूनमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. जुबेर यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 153/295 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुबेर यांचे ट्विट अत्यंत चिथावणी देणारे आणि द्वेषाच्या भावना भडकवणारे आहेत, असे एफआयआरमध्ये म्हटले होते.

हे ही वाचा:

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

खड्ड्यात लपवलेले ४० लाख हस्तगत

त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून कृत्ये केल्याचा आणि धार्मिक आधारावर शत्रुत्व वाढवल्याचा आरोप होता. त्यांच्या अटकेवर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांच्या अटकेनंतर तब्बल महिनाभर कारागृहात राहिल्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून महिनाभरानंतर जुबेर यांना जामीन मिळाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा