कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत

दोन्ही देशांच्या वाढत्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांपुढे प्रश्न

कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत

Canada India High Resolution Sign Flags Concept

कॅनडा आणि भारतामधील संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर कॅनडातील कॉलेजांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कॅनडामध्ये ८ जानेवारीपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. पंजाबमधील ३६ हजार विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असून त्यापैकी ७० टक्के विद्यार्थ्यांचा व्हिजाही आला आहे. त्यांची विमानाची तिकिटेही बुक झाली आहेत. मात्र दोन्ही देशांच्या वाढत्या ताणाच्या पार्श्वभूमीवर सगळं सुरळीत होईल ना, या विचाराने त्यांची झोप उडाली आहे.

 

सद्यस्थितीत कॅनडातील कॉलेजांत सुमारे दोन लाख नऊ हजार ९३० भारतीय विद्यार्थी तर, ८० हजार २७० विद्यार्थी विद्यापीठांत शिक्षण घेत आहेत. कॅनडातील कॉलेजांत डिप्लोमाचे शिक्षण दिले जाते. तर, विद्यापीठांत पदवी, मास्टर आणि डॉक्टरेट पदवी दिली जाते. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय विद्यार्थ्यांचे योगदान प्रति वर्षी तब्बल २२.३ अब्ज कॅनडियन डॉलरहून अधिक आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाढत्या ताणाचा कॅनडाच्या शैक्षणिक आणि आर्थिक व्यवस्थेवरही विपरित परिणाम होण्याची भीती आहे. गेल्या काही वर्षांत कॅनडात वैध व्हिजानुसार राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन!

उज्जैनमधील १२ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणी ऑटोचालकासह तिघे अटकेत!

मराठी महिलेला जागा नाकारणाऱ्या मुलुंडमधील पिता- पुत्राला अटक

विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा

पंजाबचे विद्यार्थी कॅनडात भरतात ६८ हजार कोटी रुपये फी

 

‘खालसा वॉक्स’ने शनिवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, पंजाबमधून दरवर्षी ६८ हजार कोटी रुपये केवळ फीरूपात कॅनडात भरले जातात. गेल्या वर्षी कॅनडाने दोन लाख २६ हजार ४५० व्हिजा स्वीकारले होते. त्यातील सुमारे एक लाख ३६ हजार विद्यार्थी पंजाबमधील होते. हे विद्यार्थी कॅनडात दोन ते तीन वर्षांचे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत आहेत.

 

ऑस्ट्रेलिया, युके, डेन्मार्ककडे कल

 

भारताकडून कॅनडाला असुरक्षित देश म्हणून घोषित केल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांचा कल ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्ककडे वाढू लागला आहे. ‘आमच्याकडे दर महिन्याला येणाऱ्या ५० तरुणांपैकी ४० ते ४३ जण कॅनडाला पसंती देत. वर्क परमिट आणि शैक्षणिक व्हिजासाठी कॅनडाला पसंती असे. तर, दुसऱ्या क्रमांकावर अरब देशांचा नंबर लागतो. येथे ‘वर्क परमिट’साठी अर्ज केले जातात. आता ५५ टक्के विद्यार्थी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेण्यासाठी अर्ज करत आहेत,’असे इमिग्रेशन विशेषज्ञ राजबीर सिंग यांनी सांगितले.

Exit mobile version