अलीगड मुस्लिम विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विद्यापीठातील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात एनसीसीचा गणवेश परिधान केलेल्या काही विद्यार्थ्यांचा घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी अल्लाहू अकबरच्या घोषणा देताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या धार्मिक घोषणाबाजी करत असतांना तेथे विद्यापीठाचे कुलगुरूही उपस्थित होते. याची दखल घेत पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. पोलिसांच्या आदेशानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी तपास करून आरोपी विद्यार्थ्यांवर लवकरच कारवाई करण्यास सांगितले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अलीगढ पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाला घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एनसीसीचा गणवेश परिधान केलेले आणि त्याचा झेंडा हातात घेतलेले काही विद्यार्थी तिरंग्याजवळ ‘अल्लाहू अकबर’चा नारा देताना दिसत आहेत. गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान कॅम्पसबाहेर हा व्हिडिओ शूट करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
भारतात दक्षिण आफ्रिकेतून १०० हून अधिक चित्ते येणार
कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याचे संकेत
अमृता फडणवीस यांचे देशभक्तीपर नवीन गीत
तलावांत पोहायला गेलेली तीन मुले बुडाल्याची शंका,
विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुलगुरू ताहिर मन्सूर यांनी ध्वजारोहण केल्याचे सांगितले जात आहे. कार्यक्रमानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांनी अल्लाह हु अकबरच्या घोषणा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला.
विद्यापीठ प्रशासनाने तीन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रॉक्टर वसीम अली यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ही घोषणाबाजी झाली. या घोषणाबाजीत सहभागी विद्यार्थी कोण आहेत? त्याची पडताळणी केली जात आहे. विद्यार्थ्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.