अमेरिकेत सोळा वर्षांवरील सर्वांना लस मिळणार

अमेरिकेत सोळा वर्षांवरील सर्वांना लस मिळणार

अमेरिकेत आता १६ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस घेता येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अमेरिकेत लसीकरणाचा वेग हा प्रशंसनीय राहिलेला आहे. अमेरिकेत लसीकरणासाठीची पूर्वतयारी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात ‘ऑपेरेशन वॉर्प स्पीड’ अंतर्गत करण्यात आली होती.

अमेरिकेत लसीकरणाचा वेग उत्तम आहे. दिवसाला पन्नास लाख लोकांना लसीकरण केले जात आहे. अनेक राज्यांमध्ये ५० टक्के रहिवाश्यांना लस देण्यात आली आहे. अमेरिकेत, फायझर, मॉडर्ना या लसींचा जास्तीतजास्त वापर होत आहे. फायझर ही लस अमेरिकेतच बनवली जात आहे तर मॉडर्ना या लसीची खरेदी जर्मनीतून केली जात आहे.

हे ही वाचा:

यवतमाळमध्ये बेड न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू

अरविंद केजरीवाल विलगीकरणात

दादरचे भाजी मार्केट बंद होणार?

नावात ‘ऑक्सिजन’ असल्याचा असाही फायदा

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या, ‘ऑपेरेशन वॉर्प स्पीड’मुळे फेडरल सरकारने म्हणजेच अमेरिकेच्या सरकारने लस निर्मिती आणि संशोधन करणाऱ्या अनेक कंपन्यांना अनुदान दिले. याशिवाय अनेक लसींची प्री ऑर्डर म्हणजेच लसींची निर्मिती होण्याआधीच खरेदी करून ठेवली. यामुळे लसींची निर्मिती सुरु झाल्यावर अमेरिकेत लसींचा तुटवडा जाणवला नाही. त्यामुळेच आज अमेरिकेत रोज ५० लाख लोकांना लसीकरण करणे शक्य होत आहे.

Exit mobile version