चीनमधील ग्वांगझूजवळ २१ मार्च रोजी विमान अपघात झाला होता. या अपघाताबद्दल एक दुर्दैवी माहिती समोर आली आहे. अपघात झालेल्या चायना इस्टर्न ७३७-८०० या विमानातील सर्व प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. चिनी अधिकाऱ्यांनी शनिवारी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
चीनच्या नागरी उड्डयन प्रशासनाचे उपसंचालक हू झेनजियांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
चीनमधील ग्वांगझूजवळ चायना ईस्टर्न विमान कंपनीचे बोइंग ७३७ कोसळले होते. या विमानात कर्मचाऱ्यांसह १३२ प्रवाशांचा समावेश होता. सोमवार, २१ मार्च रोजी दुपारी हे विमान डोंगरात कोसळले. अपघातस्थळ परिसरात तेव्हा पाऊस सुरू असल्याने तपासणी मोहीम थांबवण्यात आली होती. चीन इस्टर्न एअरलाइन्सच्या फ्लाइट MU5735 चे सर्व १२३ प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स २१ मार्च रोजी मरण पावले आहेत, असे आता स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ
किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार
चेन्नईला नमवून कोलकाताचा विजयी शुभारंभ
इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणातून घडला ‘लव्ह जिहाद’, मुलीची हत्या
तपास पथकाला विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले आहेत. पहिला ब्लॅक बॉक्स तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर सापडला, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या चौथ्या दिवशी सापडला. अपघाताचे कशामुळे घडला याचा तपास आता सुरू आहे.