रशियातील पुतीन विरोधी नेत्याला क्रेमलीनने ताब्यात घेतले

रशियातील पुतीन विरोधी नेत्याला क्रेमलीनने ताब्यात घेतले

रशियातील पुतिनविरोधी नेते अलेक्सि नवालनी यांना रशियाने ताब्यात घेतले आहे. जर्मनीहुन परतल्यानंतर लगेचच त्यांना ताब्यात घेण्यात आले. नवालनी यांच्यावर २०२० मध्ये विषप्रयोग करण्यात आला होता. त्यातून त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले होते.

विषप्रयोगानंतर नवालनी हे जर्मनीमध्येच होते. रशियात गेल्यावर अटक होऊ शकते याची त्यांना पूर्ण जाणीव होती. परंतू तरीही त्यांनी पुन्हा रशियात जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी रशियात परत आल्यावर लगेचच नवलनी यांना ताब्यात घेण्यात आले. मॉस्कोच्या शेरेमेटेयेवो विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या घडामोडीनंतर लगेचच युरोपियन युनियनने पुतीन आणि रशियाच्या सरकारची निंदा केली, तर लिथुएनियाने युरोपियन युनियनकडून रशियावर निर्बंध लादले जावेत अशी मागणी केली.

“नवालनी यांना केलेली अटक ही स्वीकार्ह्य नसून रशियन सरकारने त्यांना तातडीने मुक्त करावे अशी मी मागणी करतो.” असे विधान युरोपियन युनियनचे अध्यक्ष चार्ल्स मायकल यांनी केले. युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या लिथुएनियाच्या परराष्ट मंत्र्यांनी ‘रशियाने केली ही कृती अस्वीकार्ह्य असून युरोपियन युनियन रशियावर निर्बंध लादावेत’ अशी मागणी त्यांनी केली.

या अटकेतून रशियन अधिकारी कोणत्याही विरोधकांना दयामाया दाखवणार नसल्याचे संकेत देत आहेत असे दिसले.

Exit mobile version