भेकड अल कायदाकडून भारतावर हल्ल्याची धमकी

भेकड अल कायदाकडून भारतावर हल्ल्याची धमकी

इस्लामी दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाने भारतावर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. भारतातील दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश, गुजरात या शहरावर आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी या इस्लामी दहशतवादी संघटनेने दिली आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या प्रतिष्ठेसाठी हे हल्ले करण्यात येतील असे अल कायदाने धमकीच्या पत्रात म्हटले आहे.

भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, पैगंबर यांची बदनामी करणाऱ्यांना आम्ही मारू. आमच्या शरीराभोवती आणि मुलांच्या शरीराभोवती स्फोटके बांधून ज्यांनी पैगंबरांचा अपमान केला त्यांना आम्ही उडवून देऊ.

याआधी, इस्लामी देशांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली पण भारताने हे स्पष्ट केले की, ही भारत सरकारची भूमिका नाही, गौण व्यक्तीची ही भावना असू शकते. हे म्हणतानाच भारताने ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संघटनेवरही टीका केली आहे. या संघटनेची भूमिका लक्ष देण्याजोगी नाही आणि कोत्या मानसिकतेतून देण्यात आली आहे, असेही या ओआयसी संघटनेला केंद्र सरकारने खडसावले आहे.

हे ही वाचा:

भेंडी बाजारमध्ये दोन कामगार बांधकामस्थळी अपघातात मृत्युमुखी

५० लाख खर्च केले पण विजयदुर्ग दयनीयच!

नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…

आता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग

 

त्याआधी, नुपूर शर्मा यांना पक्षाने प्रवक्तेपदावरून दूर केले आणि सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेतले आहे. या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशात काही गटांनी दंगली घडविण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version