25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानात अल-कायदाच्या म्होरक्याला अटक

पाकिस्तानात अल-कायदाच्या म्होरक्याला अटक

९/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनचा सहकारी म्हणूनही ओळख

Google News Follow

Related

पाकिस्तानात दहशतवादी विरोधी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवादविरोधी अधिकाऱ्यांनी अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला अटक केली आहे. अमीन उल हक याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे.

अमीन उल हक हा अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असून त्याचा संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध यादीत समावेश आहे. शिवाय अमीन हा ९/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मृत ओसामा बिन लादेन याचा जवळचा सहकारीही होता. होता.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाने (CTD) अमीन उल हकच्या विरोधात कायदेशीर खटला नोंदवला आहे. पंजाबमधील महत्त्वाच्या प्रतिष्ठानांची तोडफोड करण्याची योजना आखल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडून अनेक वर्षांनंतर अल-कायदाच्या सदस्याला अटक करण्यात आली आहे. “दहशतवादाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण यश मिळवले असून CTD ने गुप्तचर संस्थांच्या सहकार्याने अल-कायदाचा वरिष्ठ नेता अमीन उल हक याला यशस्वीरीत्या पकडले,” असे विभागाच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे. तसेच त्याचे नाव संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट आहे, असंही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत (गृह) मंत्रालयाने अद्याप यावार काहीही टिप्पणी केलेली नाही.

हे ही वाचा:

पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार भारतीय लष्कराचे प्रशिक्षणार्थी ‘श्वान’ !

छत्तीसगडमध्ये मॉब लिंचिंग नाही तर ‘त्यांचा’ मृत्यू नदीत उडी मारल्यामुळे !

यूपीएससीने पूजा खेडकरला विचारले, आयएएसची निवड का रद्द करू नये?

विनय मोहन क्वात्रा बनले अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत !

जानेवारी २००१ पासूनच्या यादीत संयुक्त राष्ट्रांच्या मंजुरी पॅनेलने अटक केलेल्या व्यक्तीची ओळख अमीन मुहम्मद उल हक साम खान म्हणून केली आहे आणि त्याला लादेनचा सुरक्षा समन्वयक म्हणून संबोधले आहे. त्याने अल-कायदा बिन लादेन किंवा तालिबान गटांशी संबंध ठेवल्याबद्दल, त्यांना शस्त्रे आणि संबंधित सामग्रीचा पुरवठा, विक्री किंवा हस्तांतरित करणे यासारख्या कृत्यांना हातभार लावला किंवा पाठिंबा दिला, असे पॅनेलने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा