25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरदेश दुनियाअल जझीराला ‘दहशतवादी वाहिनी’ म्हणत इस्रायलमध्ये प्रक्षेपणावर बंदी

अल जझीराला ‘दहशतवादी वाहिनी’ म्हणत इस्रायलमध्ये प्रक्षेपणावर बंदी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा निर्णय

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असून दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी घोषणा केली आहे. नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर तात्काळ बंदी घालत आहेत. इस्रायलच्या संसदेने सोमवारी कायदा संमत केल्यानंतर नेतान्याहू यांनी अल जझीराला ‘दहशतवादी वाहिनी’ म्हणत ते बंद करण्याचे वचन दिले आहे. हा कायदा झाल्यानंतर सरकारला इस्रायलमधील अल जझीराचे प्रक्षेपण बंद करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इस्रायलच्या संसदेने सोमवारी कायदा संमत केल्यानंतर नेतान्याहू यांनी अल जझीराला दहशतवादी वाहिनी म्हणत ते बंद करण्याचे वचन दिले. हा कायदा झाल्यानंतर सरकारला इस्रायलमधील अल जझीराचे प्रक्षेपण बंद करण्याचा मार्ग मोकळा झाला. नेतन्याहू यांनी अल जझीरावर इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोहोचवण्याचा, ऑक्टोबर ७ च्या हमास हल्ल्यात सहभागी होण्याचा आणि इस्रायलविरुद्ध हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच या वाहिनीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे नेतन्याहू यांनी सांगितले आहे.

नेतान्याहू म्हणाले की, ‘अल जझीरा’ इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोहोचवत आहे. ही वाहिनी ७ ऑक्टोबरच्या हत्याकांडात सक्रियपणे सहभागी होती. आता आपल्या देशातून हमासचे लोक काढून टाकण्याची वेळ आली आहे. दहशतवादी वाहिनी ‘अल जझीरा’ यापुढे इस्रायलमधून प्रसारित होणार नाही. चॅनलचे प्रक्षेपण थांबवण्यासाठी नवीन कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याचा मानस आहे. अध्यक्ष ओफिर कॅट्झ यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांच्या पाठिंब्याने दळणवळण मंत्री श्लोमो कराई यांनी प्रोत्साहन दिलेल्या कायद्याचे मी स्वागत करतो.

हे ही वाचा:

सीरियामध्ये इराणी दूतावासाजवळ इस्रायलचा हवाई हल्ला

ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!

छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!

सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप

अल जझीरा मीडिया नेटवर्क हा कतारमधील एक मीडिया समूह आहे. याचे मुख्यालय दोहा येथील कतार रेडिओ आणि टेलिव्हिजन कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समध्ये आहे. हे मीडिया समूह नेटवर्क अल जझीरा इंग्लिश, अल जझीरा अरेबिक, AJ+ तसेच इतर अनेक मीडिया आउटलेट चालवते. अल जझीरा मीडिया नेटवर्कला कतार सरकारकडून सार्वजनिक निधी प्राप्त होतो. कतारी सरकारचा आपल्या बातम्यांवर प्रभाव असल्याचा दावाही अल जझीराने नाकारला आहे. अल जझीरा अनेकदा त्यांच्या मीडिया रिपोर्टिंगमुळे वादात सापडले आहे. या चॅनलवर कट्टर इस्लामकडे कल असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा