अकासा एअरचे विमान १९०० फूट उंचीवर पक्ष्याला धडकले

मोठा अपघात टळला

अकासा एअरचे विमान १९०० फूट उंचीवर पक्ष्याला धडकले

अकासा एअरचे विमान १९०० फूट उंचीवर पक्ष्याला धडकले पण सुदैवानं मोठा अपघात टळला आहे. या दुर्घटनेनंतर हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवावे लागले आहे. अकासा एअरचे बी-७३७-८ मॅक्स व्हीटी – वायएएफ हे अहमदाबाद – दिल्ली विमान १९०० फूट उंचीवर पक्ष्याला धडकले. दिल्लीत उतरल्यानंतर विमानाच्या राडोमचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ही माहिती दिली आहे.

याआधीही अकासा एअरच्या विमानाला पक्षी आदळल्याची घटना समोर आली आहे. या महिन्याच्या १५ तारखेला मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानाला पक्षी धडकला, त्यानंतर विमानाला पुन्हा विमानतळावर परतावे लागले होते . पक्ष्याला आदळल्यानंतर विमानाच्या केबिनमध्ये जळल्याचा वास त्यावेळी येत होता. विमान उतरल्यानंतर इंजिन क्रमांक १ वर पक्ष्याचे अवशेष सापडले होते .

हे ही वाचा:

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन

कोणाचा दिवा विझतोय?

आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा

ऋषी सुनक यांच्या घरी आली लक्ष्मी; पत्नी अक्षता मूर्ती यांना मिळाला १२६ कोटींचा लाभांश

अकासा एअरने गेल्या महिन्यात आपला विस्तार केला ​​आहे. चेन्नई ते तामिळनाडूची राजधानी बेंगळुरूपर्यंत विमानसेवा सुरू केली आहे. अकासा एअरने १५ सप्टेंबर २०२२ पासून चेन्नई-मुंबई मार्गावर, २६ सप्टेंबरपासून चेन्नई-बेंगळुरू मार्गावर उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ७ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद विमानाचे उद्घाटन केले होते . येत्या पाच वर्षांत ७२ विमाने एअरलाइन्समध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

Exit mobile version