अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी फासाला लटकलेल्या स्थितीत त्यांच्या खोलीत सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रयागराज येथील बाघमबरी येथे त्याचा हा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. त्यासंदर्भात प्रयागराजचे आयजी के.पी. सिंग यांनी म्हटले आहे की, सध्या यासंदर्भात तपास सुरू आहे. तो पूर्ण झाल्यावरच काय ते सांगता येईल.
सिंग यांनी सांगितले की, आम्हाला आश्रमातून फोन आला आणि नरेंद्र गिरी हे फासाला लटकलेल्या स्थितीत आहेत अशी माहिती मिळाली. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्यांचा मृतदेह जमिनीवर ठेवण्यात आला होता. दोरी पंख्याला अडकवलेल्या स्थितीत होती. त्यावेळी त्यांचा मृत्यू झालेला होता. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचे प्रकरण वाटत आहे. कारण त्या खोलीत नरेंद्र गिरी यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडलेली आहे. अनेक कारणांमुळे आपण दुःखी होतो त्यामुळे आत्महत्या करत आहोत, असे त्यात गिरी यांनी नमूद केलेले आहे.
कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आम्हाला नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याचे कळले. त्यांच्या शिष्यांनी सांगितले की, दुपारी ३-४ वाजता त्यांनी दरवाजा तोडला. तो आतून बंद होता. त्यावेळी महंत हे दोरीला लटकलेल्या स्थितीत होते.
हे ही वाचा:
‘वॅक्सीन मैत्री’ लवकरच पुन्हा सुरु
अफगाणिस्तानमधून आलेले ९ हजार कोटींचे हेरॉइन गुजरातमध्ये घेतले ताब्यात
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता दूर होणार
संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये
न्यायवैद्यक विभागाने (फॉरेन्सिक विभाग) तातडीने आश्रमात जाऊन तपास केला, पुरावे गोळा केले. त्यावेळी ही चिठ्ठी सापडली. त्यात आनंद गिरी आणि अन्य दोघांचा उल्लेख होता. त्यावरून उत्तराखंड पोलिसांनी आनंद गिरी यांना हरिद्वार येथून अटक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.