या भेटीमागे दडलंय काय?

या भेटीमागे दडलंय काय?

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे रशियाचे सुरक्षा सल्लागार असलेल्या निकोराई पात्रुशेव यांना भेटल्याचे वृत्त येत आहे. ताजिकिस्तान या देशात ही भेट झाली असून, या भेटीत भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर तसेच सुरक्षा दलांमधील परस्पर सहकार्याबद्दल चर्चा झाल्याचे समजते.

सध्या ताजिकिस्तान या देशात एससीओ अर्थात शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक झाली. ताजिकिस्तान हा देश सध्या एससीओच्या अध्यक्षस्थानी असल्यामुळे तेथे ही बैठक बोलावली गेली होती. २३ आणि २४ जून या दोन दिवशी ही बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सहभागी झाले होते. तर रशियाचे प्रतिनिधी म्हणून रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोराई पात्रुशेव हे या बैठकीसाठी आले होते.

हे ही वाचा:
दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

‘लुटा आणि वाटून खा’ हा महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे

ओबीसी आरक्षणाचा ठाकरे सरकारने मुडदा पाडला

या संधीचा फायदा घेत डोवाल यांनी रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या निकोराई पात्रुशेव यांच्यासोबत बैठक केली. ताजिकिस्तानची राजधानी असलेल्या दुशांबे या शहरात ही बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी भारत आणि रशिया या दोन देशांमधील सरंक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्याबद्दल चर्चा केल्याचे समजते तर त्या सोबतच अफगाणिस्तान आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रातील स्थितीवर दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांनी बातचीत केली.

Exit mobile version