अजित डोभाल आणि नेतान्याहू यांची भेट

ओलिसांची सुटका आणि मानवतावादी मदतीबाबत चर्चा

अजित डोभाल आणि नेतान्याहू यांची भेट

इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोभाल यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली. या दोघांमध्ये गाझापट्टीमध्ये सुरू असलेले युद्ध, दोन्ही पक्षांकडील कैद्यांची सुटका आणि मानवतावादी मदतीवर चर्चा झाली.

या चर्चेची माहिती नेतान्याहू यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे संचालक, पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणाचे सल्लागार आणि इस्रायलमधील भारताच्या राजदूतांनीही सहभाग घेतला.

इस्रायल व हमास दरम्यानच्या युद्धात आतापर्यंत ३० हजार जण मारले गेले आहेत. गाझा नगरपालिकेने रमझानच्या पार्श्वभूमीवर रविवारी मानवतावादी मदत करण्याची याचना केली. रमजान जवळ येत असताना इस्रायली हल्ल्यांमुळे गाझामधील नागरिकांना गंभीर मानवतावादी संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा..

देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!

“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”

हल्ल्यांमुळे गाझामधील पाणी, स्वच्छतेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नगरपालिकेने आंतरराष्ट्रीय संघटनेला मूलभूत सेवा, इंधन, पाणी आणि विजेची सुविधा प्रदान करण्यास मदत करण्याची मागणी केली आहे. गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीमध्ये कुपोषण आणि पाण्याअभावी आतापर्यंत २५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version