इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण, सीरिया, इराकचे हवाई क्षेत्र बंद!

नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध लादल्याची इराकची माहिती; लवकरच होणार सुरू

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण, सीरिया, इराकचे हवाई क्षेत्र बंद!

इस्रायली लष्कराने (आयडीएफ) शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी इराणमधील अनेक लष्करी तळांवर हल्ले केले. शिवाय तेहरानने तणाव वाढवण्याची चूक केली तर त्याचा बदला घेतला जाईल, असा कडक इशाराही दिला आहे. यानंतर या भागात अत्यंत तणावाची परिस्थिती आहे. इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इराण, सीरिया आणि इराकने आपली हवाई क्षेत्रे पूर्णपणे बंद केली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट FlightRadar24 यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण, सीरिया आणि इराक या तीन देशांवर सध्या कोणतेही विमान उड्डाण करत नाही. मात्र, इराणने आता या हल्ल्यांनंतर पुन्हा उड्डाणे सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. इराकने म्हटले की हल्ल्यानंतर नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हवाई क्षेत्रावर निर्बंध लादले होते.

आयडीएफच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायली हवाई दलाच्या (IAF) सहकार्याने शनिवारी सकाळी तीन टप्प्यांत इराणवर हल्ले करण्यात आले. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी तेहरानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर होती. इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की, आयडीएफने आपले ध्येय पूर्ण केले असून जर इराणच्या बाजूने पुन्हा तणाव वाढवण्याची चूक झाली, तर आम्ही प्रत्युत्तर देऊ.

हे ही वाचा : 

महायुती अमित ठाकरेंना समर्थन देणार?

सचिन वाझेला दणका; माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज फेटाळला

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेला वेग

ठाकरे गटानंतर काँग्रेसचीही दुसरी यादी जाहीर; एकूण ७१ जागांवर दिले उमेदवार

इस्रायलने शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी इराणवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. इराण ज्या लष्करी तळांवरून इस्रायलवर हल्ले करत आहे त्या इराणी लष्करी तळांना इस्रायलने लक्ष्य केले आहे. या हल्ल्यांमागे इराणची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा इस्रायलचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी, आयडीएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की भविष्यातही असे हल्ले होत राहतील. इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने १०० हून अधिक लढाऊ विमानांचा वापर केला आहे.

Exit mobile version