25 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानमधील एअर लाईन्स डबघाईला; २४ उड्डाण रद्द

पाकिस्तानमधील एअर लाईन्स डबघाईला; २४ उड्डाण रद्द

 एअरलाईन्स थकबाकी भरण्यासही सक्षम नाही

Google News Follow

Related

भारताचा शेजारी पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाला तोंड देत असताना आता पाकिस्तानमधील एअर लाईन्सवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. याचा परिणाम उड्डाणांवर होऊ लागला आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाईन्स सध्या बिकट परिस्थितीचा सामना करत आहे. तिकडे सध्या परिस्थिती अशी आहे की, त्यांच्याकडे इंधनासाठीही पैसे नाहीत. तसेच ही एअरलाईन्स थकबाकी भरण्यासही सक्षम नाही. अपुऱ्या अर्थसहाय्यामुळे गेल्या २४ तासांपासून उड्डाणे नीट चालवता आलेली नाहीत. तोट्यात चाललेल्या पीआयएला १८ ऑक्टोबर रोजी १६ आंतरराष्ट्रीय आणि आठ देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली. तसेच काही उड्डाणांना विलंब होण्याची शक्यताही वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

“मी पळालो नाही, पळवण्यात आलं” ललित पाटीलचा आरोप

बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?

गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?

फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या चेन्नईमधून आवळल्या मुसक्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीआयएला १७ ऑक्टोबर रोजी ११ आंतरराष्ट्रीय आणि १३ देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली. पीआयएच्या प्रवक्त्याचा हवाला देत अहवालात असे म्हटले आहे की, पीआयए विमानांसाठी दैनंदिन आधारावर आणि ऑपरेशनल कारणास्तव मर्यादित इंधन पुरवठ्यामुळे उड्डाणे रद्द करण्यात आली. काही फ्लाइट्सच्या डिपार्चरचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. देशांतर्गत उड्डाणे व्यतिरिक्त, काही रद्द केलेल्या उड्डाणे दुबई, मस्कत, शारजाह, अबू धाबी आणि कुवेतला जाणार होती. पीआयएने दावा केला आहे की रद्द केलेल्या फ्लाइटमधील प्रवाशांना पर्यायी फ्लाइटमध्ये सामावून घेण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा