एअर इंडियाने एकूण ४७० विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये फ्रान्सच्या एअरबस कडून २५० विमाने खरेदीचा एअर इंडियाचा व्यवहार असून अमेरिकेच्या बोईंग कडून २२० विमाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया आणि बोईंग कराराचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या कडून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. एअर इंडियाने ३४ अब्ज डॉलरचा करार केला आहे. यातून एअर इंडियाला टाटा सन्स आता नवीन उभारी देत आहे. अशी माहिती टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी दिली आहे.
Addressing a virtual meeting with President @EmmanuelMacron on agreement between Air India and Airbus. https://t.co/PHT1S7Gh5b
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2023
जो बायडन पुढे असेही म्हणाले की, एअर इंडिया आणि बोईंग यांच्यामध्ये झालेल्या विमानाच्या या ऐतिहासिक कराराची घोषणा करून या ऐतिहासिक कराराच्या माध्यमातून २०० पेक्षा अधिक विमाने खरेदी होणार आहे याचा आनंद आहे. या करारामुळे एकूण ४४ राज्यांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असून या नोकऱ्यांसाठी महाविद्यालयीन पदवीची आवश्यकता नाही. भारत देशाबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यात आम्ही जास्त उत्सुक आहोत.
या करारानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी संवाद साधला. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, या करारामुळे भारत अमेरिका संबंध दृढ झाल्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो दोन्ही देशाच्या नेत्यांनी या ऐतिहासिक कराराबद्दल या निर्णयाचे स्वागत करून दोन्ही देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत याचे समाधान आहे. पंतप्रधानांनी बोईंग आणि आणखी कंपन्याना भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात विस्तार झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक संधींचा वापर करायला आमंत्रित केले आहे.
हे ही वाचा:
रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले
लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर
महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित
टाटा सन्स एअरबस कडून २५० विमाने खरेदी करणार आहेत तर एअर इंडिया ४० ए ३५० विमाने आणि २१० माध्यम श्रेणीतील विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये १४० ए ३२० आणि ७० ए ३२१ विमानांचा समावेश असणार आहे. टाटा सन्स चे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, एअर इंडियाने एअर बसकडून २५० विमाने खरेदी करण्याची घोषणा केली असून टाटा समूहाच्या मालकीखाली एअर इंडीआयची हि पहिलीच ऑर्डर असेल.