32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनियावाचलो!! एअर इंडिया-नेपाळ एअरलाइन्स विमानांची टक्कर टळली

वाचलो!! एअर इंडिया-नेपाळ एअरलाइन्स विमानांची टक्कर टळली

नेपाळच्या हवाई वाहतूक विभागातील दोघे निलंबीत

Google News Follow

Related

नेपाळ एअर लाईन्स आणि एअर इंडियाच्या विमाने एकमेकांच्या जवळ येऊन होणारी टक्कर सुदैवाने टळली आहे. शेवटच्या क्षणी इशारा प्रणालीने वैमानिकांना सतर्क केल्यामुळे हा अपघात टाळण्यात यश आले. दरम्यान या घटनेनंतर नेपाळच्या हवाई वाहतूक विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारीचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भात सीएएएनचे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी सांगितले की, मलेशियाहून येणारे नेपाळ एअर लाइन्सचे विमान आणि आणि दिल्लीहून येणारे एअर इंडियाचे विमान एकमेकांच्या जवळ आल्याने टक्कर होण्याची भीती निर्माण झाली होती. नेपाळमध्ये एअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमाने शुक्रवारी २४ मार्च रोजी एकमेकांजवळ आली होती. परंतु, इशारा प्रणालीने वैमानिकांना सतर्क केल्यामुळे अवघ्या काही क्षणात संभाव्य अपघात टळला. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

हे ही वाचा:

लांगुलचालन करत असतील तर उद्धव ठाकरेंना याचं उत्तर बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल

महाराष्ट्राची डरकाळी! जागतिक मानकांच्या व्याघ्र प्रकल्पात नवेगाव, मेळघाट, ताडोबा

खतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड

आठ वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू

निरौला यांनी सांगितले की, एअर इंडियाचे विमान १९ हजार फुटांवरून खाली येत होते. तर नेपाळ एअरलाइन्सचे विमान त्याच ठिकाणी १५ हजार फुटांवर होते. रडारवर हे दिसल्यानंतर नेपाळ एअरलाइन्सचं विमान 7 हजार फूट आणखी खाली आले आणि मोठा अपघात टळला. या घटनेनंतर हवाई वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणी तपास करण्यासाठी 3 सदस्यीय तपास समितीची स्थापना केली आहे. सीएएएनने या घटनेच्या वेळी कंट्रोल रूमचे प्रभारी असलेल्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा