चीनमधील कोरोना धोरणाविरोधातील आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या बीबीसी पत्रकाराला अटक

चीनमधील कोरोना धोरणाविरोधातील आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या बीबीसी पत्रकाराला अटक

चीनमध्ये सध्या कोरोनाचा पुन्हा एकदा जबरदस्त प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथील कोरोना धोरणाविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. शांघाय शहरात अशा एका आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या बीबीसीच्या पत्रकाराला अटक करण्यात आली. बीबीसीने या अटकेचा निषेध केला आहे.

बीबीसीने म्हटले आहे की, या पत्रकाराला अटक कऱण्यात येऊन त्याच्या हातात बेड्या घालण्यात आल्या आणि त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले.

बीबीसीने या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकार एड लॉरेन्स या आंदोलनाचे वार्तांकन करत असताना त्याला लाथांनी मारण्या आले आणि नंतर त्याला मारहाणही झाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला बराच वेळ आपल्या ताब्यात ठेवले आणि नंतर त्याला सोडण्यात आले. बीबीसीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

बीबीसीने म्हटले आहे की, या घटनेचा आम्ही निषेध करतोच आहोत पण यासंदर्भात जर चीनने माफी मागितली तरी आम्ही ती मान्य करणार नाही. हा पत्रकार एका प्रतिष्ठित संस्थेचा सदस्य आहे. आपले काम करत असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला, हे निंदनीय आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंनी अशी काही कांडी फिरवली की…

‘गांधी हत्येचे धागेदोरे हे काँग्रेसपर्यंत पोहोचतात’

बेलापूरहून अलिबागला जा आता वॉटर टॅक्सीने

मुंबईचे अग्निशमन दल चढणार प्रगतीची ऑस्ट्रेलियन ‘शिडी’

सध्या चीनमध्ये वाढत्या कोरोनाविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलने होत आहेत. झीरो कोविड धोरणाचा लोक विरोध करत आहेत. शिवाय, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना हटविण्याची मागणीही लोक करत आहेत.

शिनजियांग येथे एका अपार्टमेंटला आग लागली होती पण तिथे कोविड धोरणांमुळे अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकली नाही. त्यात १० लोकांचा मृत्यू झाला. त्यासाठी मग कँडल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यातून ही आंदोलने आता सुरू झाली आहेत.

Exit mobile version