पटना एनआयटीच्या बीटेक (कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कॅम्पसमध्ये पोहोचून विद्यार्थिनीला दवाखान्यात नेत तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. विद्यार्थिनी मुलींच्या वसतिगृहात बांधकाम सुरू असताना राहत होती. तसेच विद्यार्थ्याने हे पाऊल उचलण्यामागचे कारणही स्पष्ट झालेले नाही.
सिकंदरपूर येथील बिहटा एनआयटी कॅम्पसमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मुलींच्या वसतिगृहात ही घटना घडली. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे राहणाऱ्या पल्लवी रेड्डी या विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण एनआयटी कॅम्पस परिसर हादरून गेला होता. या घटनेमुळे विद्यार्थी मात्र संतप्त झाले. रात्री उशिरा सर्व विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर आले आणि त्यांनी कॅम्पसमध्ये गोंधळ आणि घोषणाबाजी केली.
पटना (पश्चिम) शहराचे एसपी शरथ म्हणाले, “20 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, बिहटा एनआयटी कॅम्पसच्या वसतिगृहात मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ज्या खोलीत मुलीचा मृतदेह मिळाला सध्या त्या खोलीची तपासणी सुरु आहे. कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.”
विद्यार्थिनीच्या मित्रांनी सांगितले की, विद्यार्थिनी शुक्रवारी दिवसभर चांगली होती मात्र ती रात्री जेवायला गेली नाही. दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास पल्लवीची रूममेट जेवण करून चौथ्या मजल्यावरील तिच्या खोलीत परतली तेव्हा तिला मैत्रिणीची फासावर लटकलेली अवस्था बघून धक्काच बसला. या घटनेनंतर वसतिगृहात एकच गोंधळ उडाला. याबाबत मुख्याध्यापकांना माहिती देण्यात आली.
यह भी पढें:
अंबानींचा ‘अँटिलिया’ वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधला आहे: फरार आरोपी झाकीर नाईक!
आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
शब्द बदलले पण अर्थ तोच! पुन्हा एकदा शीखांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचे ट्विट
रात्री उशिरा विद्यार्थी वसतिगृहाबाहेर येऊन कॅम्पसमध्ये जमा झाले. एनआयटी पटनाच्या संचालकांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांनी जमा होऊन तीव्र घोषणाबाजी केली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, विद्यार्थिनीला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. पोलिसांच्या पथकाने मृताच्या खोलीची झडती घेतली, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. NIT बिहटा कॅम्पस अद्याप पूर्णपणे तयार झालेला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे कि, येथे राहून अभ्यास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम सुरू असल्याने येथे मजूरही राहतात, त्यामुळे मुलींचेही हाल होत आहेत.