पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनी दिला इशारा

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनी दिला इशारा

FILE PHOTO: Leader of the opposition Mian Muhammad Shehbaz Sharif, brother of ex-Prime Minister Nawaz Sharif, gestures as he speaks to the media at the Supreme Court of Pakistan in Islamabad, Pakistan April 7, 2022. REUTERS/Akhtar Soomro/File Photo

भारताचा शेजारी देश श्रीलंका दिवाळखोर झाला असताना भारताचा आणखी एक शेजारी देश दिवाळखोरीच्या संकटात सापडला आहे. पाकिस्तानच्या परकीय चलनाचा साठा इतका कमी झाला आहे की हा देश केव्हाही परकीय कर्जाची परतफेड करण्याच्या बाबतीत डिफॉल्टरच्या श्रेणीत येऊ शकतो, अशी शक्यता आता आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी फिचच्या अहवालानुसार, जून महिन्यात पाकिस्तानचा परकीय चलन साठा ८.२४ अब्ज डॉलरवर आला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पाकिस्तानची केंद्रीय बँक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने देशाच्या सरकारला सर्व अनावश्यक वस्तूंची आयात ताबडतोब थांबवण्याचा सल्ला दिला होता.

‘फिच’ने जगभरातील १७ देशांची यादी जारी केली आहे, जे मर्यादित परकीय चलनाच्या साठ्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले आहेत. या देशांकडे परकीय चलनाचा साठा एवढा कमी असून त्यांना कर्ज फेडणे कठीण झाले आहे. त्यामुळे या देशांना कर्ज परतफेडीच्या बाबतीत कधीही डिफॉल्टर घोषित केले जाऊ शकते.

फिच रेटिंग एजन्सीने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या १७ देशांची यादी तयार केली असून या यादीत पाकिस्तानचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच लेबनॉन, ट्युनिशिया, रशिया, इथियोपिया, घाना, ताजिकिस्तान, बेलारूस, युक्रेन, सुरीनाम, अर्जेंटिना आणि एल साल्वाडोर या देशांची नावेही या यादीत आहेत. या यादीतील रशिया हा एकमेव देश आहे, ज्याच्याकडे पुरेसा पैसा आहे, परंतु अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे तो डॉलरच्या रूपात आपले परकीय कर्ज फेडू शकत नाही.

फिचच्या अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली होती. तसेच सर्व अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर तात्काळ बंदी घालावी याबाबत सुचवले होतेस्टेट बँक ऑफ पाकिस्तानने सरकारला स्पष्ट केले आहे की, परकीय चलनाचा साठा इतका कमी झाला आहे की जर लवकरच आंतरराष्ट्रीय एजन्सी किंवा इतर देशांकडून मदत मिळाली नाही तर पाकिस्तानची आयात पूर्णपणे थांबेल. शिवाय कर्जाची परतफेड करण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरेल. त्यामुळे दिवाळखोरीचा धोका निर्माण होणार आहे.

हे ही वाचा:

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींनी भव्य अशोक स्तंभाचे केले अनावरण

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

झारखंडच्या ‘ज्या’ शाळांनी नियम बदलले, त्यांच्यावर होणार कारवाई

आंतरराष्ट्रीय एजन्सी ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सध्याच्या जागतिक परिस्थितीत हे देश दिवाळखोरीच्या स्थितीत पोहोचले तर त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव येईल. जागतिक गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक काढून घेतील. असे झाल्यास ज्या देशांकडे सध्या परकीय चलनाचा पुरेसा साठा आहे, त्यांच्यासमोर परकीय चलनाचे संकट उभे राहू शकते. जगातील अनेक देशांमधील परकीय चलन साठ्याच्या कमकुवत स्थितीमुळे जगभरात असमतोलाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे जग जागतिक मंदीकडेही जाऊ शकते, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

Exit mobile version