25 C
Mumbai
Monday, January 13, 2025
घरक्राईमनामामसूद अझहरच्या भाषणाच्या वृत्तानंतर भारताने पाकला ‘दुटप्पीपणा’वरून सुनावले

मसूद अझहरच्या भाषणाच्या वृत्तानंतर भारताने पाकला ‘दुटप्पीपणा’वरून सुनावले

अझहरवर कारवाई करण्याची मागणी

Google News Follow

Related

पाकिस्तानमधील बहावलपूरमधील एका सार्वजनिक मेळाव्यात संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याने जाहीर भाषण दिल्याच्या वृत्तानंतर भारताने पाकिस्तानला अझहरविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, जर हा अहवाल बरोबर असेल तर यावरून पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांबाबतचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद याचा प्रमुख मसूद अझहर याच्यावर कठोर कारवाई केली जावी. यापूर्वी पाकिस्तानने अझहर हा पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा वेळोवेळी केलेला आहे, अशी मागणी करत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भूमिका मांडली आहे. जर त्याच्या भाषणाबाबतचा अहवाल बरोबर असेल तर हे सर्व पाकिस्तानच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश करते. मसूद अझहरचा भारतावर सीमेपलीकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असेही ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

मालेगाव मनी लाँडरिंग प्रकरण: ईडीकडून १३.५ कोटी रुपये जप्त

हे तर मोनालिसापेक्षाही गूढ स्मित…

ठाकरेंचा कडेलोट नेमका कोणामुळे झाला…

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मे २०१९ मध्ये मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले होते. तर भारताने सप्टेंबर २०१९ मध्ये मसूद याला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. अझहर हा २००१ मध्ये झालेल्या संसदेच्या हल्ल्यात, २००१ मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभा संकुलावर झालेला हल्ला, २०१६ मध्ये पठाणकोटमध्ये झालेला हल्ला, २०१९ चा पुलवामा दहशतवादी हल्ला आणि श्रीनगरमधील बीएसएफच्या छावण्यांवरील विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. भारताने १९९४ साली त्याला अटक केली होती परंतु, १९९९ मध्ये कुप्रसिद्ध IC-814 अपहरणाच्या वेळी ओलिसांच्या बदल्यात त्याला सोडण्यास भाग पाडले गेले. त्याने त्याच्या सुटकेनंतर जैश-ए-मोहम्मदची स्थापना करत दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या म्हणण्यानुसार, जैश ओसामा बिन लादेनच्या अल-कायदा आणि तालिबानशी आर्थिक, नियोजन आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा