पाकिस्ताननंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही राम मंदिर निर्माणासंबंधी ओकली गरळ

पाकिस्ताननंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही राम मंदिर निर्माणासंबंधी ओकली गरळ

अयोध्येत राम मंदिराचा भव्य असा सोहळा पार पडला. देशासह जगभरात याचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. मात्र, भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानला चांगल्याचं मिरच्या झोंबल्याचं दिसून आलं. पाकिस्तानने या सोहळ्याचा निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ‘एक्स’ या सोशल मीडियावर प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. “भारतामधील अयोध्या शहरातील बाबरी मशीद पाडून त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या राम मंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आम्ही निषेध करतो,” असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यानंतर ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ म्हणजेच ‘ओआयसीने’ही याबद्दल गरळ ओकली आहे.

ओआयसी या ५७ मुस्लिम देशांच्या संघटनेने सोमवारी अयोध्येत झालेल्या रामलल्लाच्या अभिषेकानंतर प्रतिक्रिया दिली आहे. बाबरी मशीद पाडून बांधलेल्या या मंदिराचा आम्ही निषेध करतो, असे ओआयसीने निवेदन जारी केले आहे. ओआयसीच्या महासचिवांनी भारतातील अयोध्येत आधीच बांधलेली बाबरी मशीद पाडून नुकत्याच बांधलेल्या राम मंदिराच्या बांधकाम आणि उद्घाटनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बाबरी मशीद गेल्या ५०० वर्षांपासून त्याच ठिकाणी उभी होती.”

हे ही वाचा:

कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!

हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार

श्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार

भव्य राम मंदिरात रोज होणार पूजा; पहाटे चार वाजता रामलल्ला उठणार

ओआयसी म्हणजे काय?

चार खंडातील ५७ देशांची ही संघटना आहे. यातील सदस्य देशांचा एकूण जीडीपी सुमारे ७.७ ट्रिलियन डॉलर आहे. याचे मुख्यालय सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आहे. ओआयसीवर आखाती देश सौदी अरेबिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचे वर्चस्व मानले जाते. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्द निर्माण करताना मुस्लिमांचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक विधी पार पडला. अभिषेकावेळी राम लालाच्या प्रतिमेचे अनावरणही करण्यात आले. अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी रामललाच्या मूर्तीची आरती केली. यानंतर आता मंदिर सामान्य भाविकांसाठी खुले झाले आहे.

Exit mobile version