मध्य आशियात इस्रायलने आक्रमक भूमिका घेतली असून काही दिवसांपूर्वीचं हिजबुल्ला दहशतवादी गटाचा प्रमुख हसन नसरल्ला याला इस्रायलने टिपले होते. यानंतर एकीकडे इस्रायल हमास आणि हिजबुल्ला विरोधात लढत असून इराणनेही इस्रायल विरुद्ध आघाडी उघडली आहे. हिजबुल्ला दहशतवादी गटाचा प्रमुख हसन नसरल्ला याला ठार केल्यानंतर इराणने इस्रायलला लक्ष्य केले होते. दरम्यान. नसरल्लाच्या मृत्युनंतर हिजबुल्लाकडून हाशिम सफिद्दीन याची प्रमुख पदी नियुक्ती करण्याची शक्यता होती. पण, त्याचाही इस्त्रायलने खात्मा केल्याचे वृत्त समोर आले आहे. हा हिजबुल्लासाठी मोठा झटका मानण्यात येत आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने बेरूतमध्ये हल्ला करत हिजबुल्लाचा संभाव्य प्रमुख हाशिम सफिद्दीन याला टिपले. इस्रायली संरक्षण दल (आयडीएफ) किंवा लेबनॉनमधील हिजबुल्ला यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र, स्थानिक माध्यमांनी या वृत्तांना दुजोरा दिला आहे. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या म्हणण्यानुसार, इस्रायलने गुरुवारी मध्यरात्री बेरूतवर हवाई हल्ला केला. त्यावेळी सफीद्दीन भूमिगत बंकरमध्ये हिजबुल्लाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर होता.
Hashem Safieddine, who was regarded as the potential successor of Hassan Nasrallah, was targeted & reportedly killed in Israel's latest attack on #Beirut
His son is married to the daughter of the former Quds Force leader Qassem Soleimani who was assassinated in a strike order by… pic.twitter.com/9C0Tjws2tO
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) October 4, 2024
हे ही वाचा..
दुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’ – देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा
अटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!
उबाठाचे गाणे ‘उतलो माय, मातलो गं माय’ असं हवं होतं !
मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात; एअरबॅग्जमुळे जीवितहानी टळली
अमेरिकेने २०१७ साली हाशिम सफिद्दीन याला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. हाशिम सफिद्दीन हा हिजबुल्लाच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून तो लष्करी ऑपरेशन्सचे व्यवस्थापन करणाऱ्या गटाच्या जिहाद परिषदेचा सदस्य आहे. नसरल्लाचा चुलत भाऊ असलेला हाशिम सफिद्दीन हिजबुल्लामध्ये प्रमुख मानला जातो. तसेच, त्याचे इराणी राजवटीशी जवळचे संबंध आहेत. हाशिम सफिद्दीन स्वतःला पैगंबर मोहम्मद यांचा वंशज असल्याचा दावा करत होता. हाशिम नेहमी काळी पगडी बांधत होता. त्याने इराक येथील नजफ आणि इराणमधील कुम येथील धार्मिक मदरशातून शिक्षण घेतले होते. १९९४ मध्ये तो लेबनॉनमध्ये परतला. लवकरच त्याने हिजबुल्ला संघटनेत स्वतःचे नवे स्थान तयार करून वरिष्ठ पदावर पोहचला.