31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरदेश दुनिया...म्हणून पायलट्सचे पाय लटपटू लागले!

…म्हणून पायलट्सचे पाय लटपटू लागले!

Google News Follow

Related

टाळेबंदीमुळे बहुतांशी जगातील विमानसेवांवर चांगलाच परीणाम झाला होता. आता सर्वत्र बहुतांशी व्यवहार हे सुरळीत होऊ लागले आहेत. त्यामुळे विमानसेवा सुद्धा पुन्हा एकदा कार्यान्वित होत आहेत. परंतु विमानसेवा सुरु झाली खरी, पण पायलट मात्र छोट्या चुका करू लागले आहेत. इतक्या दिवसांच्या ब्रेकनंतर पायलट कामावर रुजू झाले. परंतु त्यांच्या कामावर या ब्रेकचा चांगलाच परिणाम झालेला दिसला.

अमेरिकेतील विमान प्रवासाच्या अनुभवाबाबत ब्लूमबर्गनं दिलेल्या बातमीनुसार एक पायलट विमानाचं उड्डाण करताना दुसरं इंजिन सुरू करायलाच विसरला. सुदैवानं पायलटनं हे टेकऑफ रद्द केलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. कोरोना काळात हा पायलट ७ महिने सेवेतून बाहेर होता आणि त्याला कोरोनाचीही लागण होऊन गेली होती.

दुसऱ्या एका घटनेत पायलट विमानाचं लँडिंग करताना चाकं उघडायचंच विसरून गेला. आयत्या वेळी त्याच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यानं लँडिंग पुढे ढकलून वेळ ऍडजस्ट केली आणि सेफ लँडिंग केलं. तर आणखी एका घटनेत एका बिझी एअरपोर्टवर पायलट विमान चुकीच्या दिशेला घेऊन गेला. हे विमान चालवणारा पायलट गेल्या सहा महिन्यांपासून घरी होता आणि त्याला नुकताच कोरोना होऊन गेला होता.

काही आठवड्यांपूर्वी एक प्रवासी विमान चक्क चुकीच्या दिशेने निघाले होते. याचे कारण म्हणजे सहा महिन्यांहून अधिक काळानंतर प्रथमच डेकवर परतलेल्या कॅप्टनने त्या विमानाचे सारथ्य केले होते. अशा अनेक चुका सध्याच्या घडीला जगभरातील विमानतळांवर दिसत आहेत. कोविड दरम्यान उड्डाणांची संख्य फारच रोडावली होती. त्यामुळेच सध्याच्या घडीला या अशा चुका दिसून येत आहेत. या व इतर अनेक चुका आजच्या घडीला पायलटकडून होताना दिसत आहेत.

 

हे ही वाचा:

ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा

उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला

‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

‘पवार कुटुंब जनतेला लुटत आहे’

 

सध्याच्या घडीला जगभरामध्ये केवळ १ लाख वैमानिक कार्यरत आहेत. त्यामुळेच जवळपास दीड वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा उड्डाणासाठी आल्यावर त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. यामुळेच अगदी साध्या साध्या चुका जगभरातील वैमानिकांकडून होत आहेत.

दीड वर्षांच्या कालावधीनंतर विमान धावपट्टीवर उतरवताना अनेक पायलट गोंधळत आहेत. तसेच इतरही अनेक छोट्या चुका पायलट करत आहेत. त्यामुळेच आता विमान कंपन्यांसमोर पायलटचे पुन्हा एकदा ट्रेनिंग घेणे हा महत्त्तवाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा