अमेरिका संतापली; लवकरच इराणसमर्थक गटांवर हल्ले करणार

जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळावरील हल्ल्यानंतर उचलणार पाऊल

अमेरिका संतापली; लवकरच इराणसमर्थक गटांवर हल्ले करणार

जॉर्डन येथील अमेरिकी लष्कराच्या तळावर इराणसमर्थित गटाने केलेल्या हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिक ठार झाले होते. या हल्ल्यामुळे अमेरिका संतापली असून लवकरच इराणच्या विविध समर्थक गटांवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. केवळ अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने कठोर कारवाई करावी, असा जोरदार राजकीय दबाव राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर वाढत चालला आहे.

अमेरिकेच्या लष्करावरील ड्रोन हल्ल्याला इराण समर्थक गट जबाबदार असल्याने जो बायडेन यांच्यावर दबाव वाढत आहे. त्यामुळे इराणच्या बाहेरील प्रदेशांसह इराणमध्येही हल्ला करण्याची अमेरिकेची योजना असल्याचे समजते. जो बायडेन यांनी त्यांच्या सल्लागारांना अमेरिकेच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्याचे पर्याय सादर करण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा:

सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हीडिओ फिलिपिन्समधून झाला व्हायरल!

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला आलेल्या इमामांविरोधात निघाला फतवा!

हेमंत सोरेन यांची पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील!

‘अधीर रंजन म्हणजे काँग्रेसमधील छुपे शत्रू’

विरोधकांचे हल्ले रोखताही येतील आणि इस्त्रायल-हमास युद्ध व हुती गटाच्या हल्ल्यांमुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या प्रदेशात ठिणगी पेटणार नाही, असा पर्याय जो बायडेन यांना हवा आहे. सध्या तरी जो बायडेन यांनी मौन धारण केले आहे. कोणताही ठोस निर्णय घेतल्याशिवाय जो बायडेन यांचे अधिकृत निवेदन जाहीर होणार नाही. पेंटेगॉननेही या हल्ल्यानंतर तातडीने निवेदन जाहीर करून अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली होती.

‘आम्हाला दुसरे युद्ध नको आहे. आम्हाला परिस्थिती आणखी बिघडू द्यायची नाही. परंतु जे अत्यावश्यक आहे, ते आम्ही करूच,’ असा निर्धार अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी व्यक्त केला होता. हा हल्ला इराणसमर्थित तेहरा या गटानेच केला होता, असा दावा त्यांनी केला. तसेच, या हल्ल्याचा इस्लामिक गटाशी संबंध त्यांनी फेटाळून लावला होता.

Exit mobile version