25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाभारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ

भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ

भारताने २.३ अब्ज पौंड परत करा म्हणून केली उफराटी मागणी

Google News Follow

Related

भारताचे चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्यानंतर सर्व देशांनी भारताचे कौतुक केले. अगदी भारताविरुद्ध सातत्याने विष ओकणाऱ्या चीनच्या ग्लोबल टाइम्सनेही तारीफ केली. भारताचे शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्ताननेही शुभेच्छा दिल्या, पण ब्रिटनमधून मात्र द्वेषाने पछाडलेल्या प्रतिक्रिया उमटल्या.

 

 

भारताची प्रचंड लूट करणाऱ्या ब्रिटनच्या काही पत्रकार व अभिजन वर्गातील लोकांना भारताचे हे यश बघवले नाही. त्यांनी चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर गरळ ओकायला सुरुवात केली. बीबीसीच्या एका पत्रकाराने तर प्रश्न विचारला की, भारतात प्रचंड गरिबी आहे, लोकांसाठी शौचालये नाहीत मग त्यांनी एवढा खर्च चांद्रयान मोहिमेवर खर्च करण्याची गरज काय?

 

 

हा जळफळाट केवळ एका चॅनेलपुरता मर्यादित राहिला नाही तर सोशल मीडियात अनेक व्यावसायिक, पत्रकार, लेखक, साहित्यिक यांनीही भारताला ब्रिटनकडून मदतनिधी का दिला जातो, असा उफराटा सवाल उपस्थित केला.  ग्रेट ब्रिटन न्यूजच्या अँकरने म्हटले की, भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केली त्याचे कौतुक पण आम्ही भारताला २.३ अब्ज पौंड दिले आहेत, ते त्यांनी परत करावेत. त्यावर सोशल मीडियात प्रतिक्रिया येण्यापूर्वीच ट्विटरने त्याबाबत खरी माहिती दिली. ही व्यक्ती खोटी माहिती देत असल्याचे ट्विटरने म्हटले. ज्या पैशाबद्दल हा अँकर सांगत आहे, त्यातील १.३ अब्ज पौंड इतकी रक्कम भारत सरकारला मिळालेले नाहीत तर ही रक्कम भारतातील विविध प्रकल्पांत गुंतवणूक केलेली आहे. ही रक्कम भारत सरकार, इस्रो किंवा अन्य सरकारी संस्थांना मिळालेली नाही. बाकी रक्कम ही बिगर सरकारी संस्थांना देण्यात आली आहे.

 

 

अशीच एक प्रतिक्रिया सोफी कोरकोरानने व्यक्त केली आहे. तिने म्हटले की, जो देश चंद्रावर रॉकेट्स सोडू शकतो त्यांना मदत देण्याची गरज काय? चंद्रावर रॉकेट सोडले जात नाही तर स्पेसक्राफ्ट सोडले जाते याचेही भान सदर व्यक्तीला नव्हते.

हे ही वाचा:

चाकरमान्यांना दिलासा; चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार

पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले

मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल बांधील

जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाची घोषणा

 

हॉवर्ड बेकेटने म्हटले आहे की, २५ कोटी लोक हे गरिबीत जगत आहेत. १.३ अब्ज लोकांचे दिवसाचे उत्पन्न २.५० पौंडही नाही. अशा या देशाने जर चांद्रयान सोडले असेल तर मग त्यांनी गरिबीही दूर करावी. सिल्वियो टॅटिस्कोनीने म्हटले आहे की, आम्ही भारताला ३३.४ दशलक्ष पौंड इतकी मदत केलेली आहे. पुढील वर्षी ती ५४.५ दशलक्ष पौंड इतकी होईल. मग इतकी मदत आपण त्यांना का देत आहोत? डेली एक्स्प्रेसने म्हटले आहे की, भारताने २.३ अब्ज पौंड इतकी रक्कम गेल्या पाच वर्षांत घेऊन चंद्रावर यान उतरवले.

 

 

या ब्रिटनने भारतावर सत्ता गाजवताना भारतातील ४० ट्रिलियन संपत्ती लुटल्याचे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे ब्रिटननेच भारताला ही रक्कम परत करायला हवी अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा