जर्मन निवडणुकीनंतर चित्र अस्पष्टच?

जर्मन निवडणुकीनंतर चित्र अस्पष्टच?

अँजेला मर्केल यांना चॅन्सेलर म्हणून १६ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. जर्मन नागरिकांनी त्यांच्या जागी नवीन चॅन्सेलरसाठी तयारी केली आहे. पण हा निकाल इतका कमी फरकाचा आहे की, पुढील चॅन्सेलर कोण असेल आणि पुढील सरकार कसे असेल हे सांगणं अशक्य झालं आहे. नवीन चॅन्सेलर निवडण्यासाठी लोकांनी रविवारी निवडणुकीत मतदान केले.  प्राथमिक निकालांनंतर सोशल डेमोक्रॅट्स या पक्षाला १.६ टक्के गुणांची आघाडी दिली आहे.

जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत अँजेला मर्केल यांच्या कन्झर्वेटीव्ह पक्षाला पराभवाचा धक्का बसत आहे. अँजेला मर्केल यांनी याआधीच घोषणा केली होती की, यावेळी त्या चान्सलर पदासाठी निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळेच पक्षाला याचा फटका बसल्याचं म्हटलं जात आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानुसार जर्मनीत सोशल डेमोक्रेट्सने बहुमताचा दावा केला आहे. अद्याप अंतिम निकाल हाती आलेले नसले तरी डेमोक्रेट्सने आघाडी मिळवली असून मर्केल यांचा कन्झर्वेटिव पक्ष पिछाडीवर आहे.

रविवारच्या निवडणुकीने जर्मनी आणि युरोपसाठी एका युगाच्या समाप्तीचे संकेत दिले. एक दशकाहून अधिक काळ, मर्केल केवळ जर्मनीच्या चॅन्सेलर नव्हत्या तर प्रभावीपणे युरोपचे करत होत्या. त्यांनी त्यांच्या देशाला आणि खंडाला एकापाठोपाठ एक संकटातून पुढे नेले आणि या प्रक्रियेत जर्मनीला दोन महायुद्धांनंतर प्रथमच युरोपची आघाडीची शक्ती बनण्यास मदत केली.

हे ही वाचा:

लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!

‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल

जर्मनीमध्ये पुन्हा एकदा आघाडी सरकार बघायला मिळू शकते. सोशल डेमोक्रेट्स आणि कन्झर्वेटिव्ह पक्षाकडून यासाठी हालचाली सुरु आहेत. नव्या सरकार स्थापनेसाठी आणखी काही काळ जाण्याची शक्यता आहे. सोशल डेमोक्रेट्स पक्षाच्या चान्सलर पदासाठी उमेदवार असलेल्या ओलाफ शोल्ज यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पक्षाने प्रत्येक ठिकाणी आघाडी मिळवली आहे.

Exit mobile version