डोमिनिकानंतर गयाना आणि बार्बाडोसकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान जाहीर!

पश्चिम आफ्रिका देशांच्या दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी गयानामध्ये दाखल

डोमिनिकानंतर गयाना आणि बार्बाडोसकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान जाहीर!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत ते या तीन देशांच्या दौऱ्यावर असणार होते. या दौऱ्या दरम्यान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी झाले त्यानंतर आता ते गयाना येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांना गयाना आणि बार्बाडोस या दोन देशांनी त्यांच्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वीचं डोमिनिका या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला होता. त्यानंतर आता गयाना आणि बार्बाडोस या देशांनीही नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. गयाना देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणार आहे. तर, बार्बाडोस त्यांच्या प्रतिष्ठेच्या अशा ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार देऊन नरेंद्र मोदींचा सन्मान करणार आहे.

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कामाचा डंका गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात गुंजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याची दखल घेऊन वेळोवेळी अनेक मोठ्या देशांनी त्यांचा सर्वोच्च सन्मान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल डॉमिनिकाने हा पुरस्कार देऊ केला आहे. डोमिनिका हा उत्तर अमेरिका खंडातील कॅरिबियन प्रदेशात स्थित एक देश आहे. कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेल्या कामाची दखल घेत या देशाने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला. ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ असे या सन्मानाचे नाव असून या विशेष सन्मानामुळे भारत आणि डॉमिनिका यांच्यातील भागीदारी आणखी मजबूत होईल असा विश्वास आहे.

हे ही वाचा:

बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का? भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंना सवाल

विधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

तावडे यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत!

बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…

पश्चिम आफ्रिका देशांच्या दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी हे आज गयाना येथे पोहोचले. याआधी त्यांनी नायजेरिया आणि ब्राझीलचा दौरा केला. नरेंद्र मोदी हे ५६ वर्षांत गयानाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांनी पीएम मोदी यांचे विमानतळावर भव्य स्वागत केले.

Exit mobile version