संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) भारताचा कायमस्वरूपी सदस्य म्हणून विचार व्हावा यासाठी अमेरिकेची सकारात्मक भूमिका आहे. अमेरिकेचा भारतासह जर्मनी आणि जपानला पाठिंबा आहे, असे ‘व्हाइट हाऊस’तर्फे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी रशियाने भारताला पुन्हा एकदा उघडपणे पाठिंबा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटलं की, “सुरक्षा परिषद अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी लोकशाही मजबूत होणं आवश्यक आहे. त्यामुळे भारत आणि ब्राझीलला सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळायला हवं.”
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारत, जपान आणि जर्मनीला UNSC चे स्थायी सदस्य बनवण्यासाठी पाठिंबा दिला होता. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही आमसभेतील त्यांच्या भाषणात संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास पाठिंबा व्यक्त केला होता. बदलत्या जगाला आणि नव्या समस्यांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी सर्वांना सहभागी करून घेणे अधिक फायदेशीर आहे, असं बायडेन यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
ठाकरे, शिंदे समर्थक धारावीत भिडले, तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?
सुरक्षा समितीमध्ये सध्या पाच कायमस्वरुपी आणि १० अस्थायी सदस्य देश आहेत. अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य असलेले देश असून ते कोणत्याही मुद्द्यावर व्हेटो अधिकार वापरू शकतात. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार इतरही देशांना या समितीत स्थान मिळणे आवश्यक आहे, अशी भारताची भूमिका आहे.