सात दशकांनंतर भारतात झाला चित्त्याचा जन्म; सियाला झाली चार पिल्ले

कुनो राष्ट्रीय उद्यानांत झाला चार चित्त्यांचा जन्म

सात दशकांनंतर भारतात झाला चित्त्याचा जन्म; सियाला झाली चार पिल्ले

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या एका सिया नावाच्या चित्त्याने आज चार निरोगी पिलांना जन्म दिला आहे. ते उत्तम स्थितीत आहेत. हि एक चांगली बातमी असून ते नवीन वातावरणाशी जुळवून घेत आहेत हेच ह्यावरून कळत आहे. मूत्रपिंडाच्या विकाराने नुकतेच तीन दिवसांपूर्वी एका साशा या चित्त्याने आपले प्राण सोडले होते. तिला मूत्रपिंडाचा आजार होता. आज या चार पिलांच्या जन्माची माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्या पिलांचे फोटो ट्विट करत कळविली आहे.

साडे चारवर्षीय साशा दक्षिण आफ्रिकेच्या नामिबियामधून मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणण्यात आलेल्यांपैकी आठ चित्यांपैकी एक होती. दोन दिवसापूर्वी झालेला ह्या साशाचा मृत्यू हा एक खूप मोठा धक्का होता. आता या उरलेल्या सात चित्यांपैकी तीन नर आणि एका मादीला उद्यानाच्या खुल्या क्षेत्रात सोडण्यात आले असून, ते व्यवस्थित आणि निरोगी आहेत. असे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी निवेदनात सांगितले आहे.

मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून कुनो राष्ट्रीय उद्यानात बारा चित्त्यांना आणले असून सध्या ते विलगीकरणामध्ये असून ते अत्यंत निरोगी आणि सक्रिय आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कुनो राष्ट्रीय उद्यानात १७ सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात एकूण आठ चित्ते नामिबियातून आले. ज्यामध्ये पाच मादी आणि तीन नर यांचा समावेश आहे. भारतात १९४७ साली अखेरचा चित्ता मरण पावला. त्यानंतर आता २०२३ साली चित्त्याच्या चार पिलांचा जन्म होणे हे खूपच सुखावह आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील ३० दिवस होणार १५ % पाणीकपात

गुगल, मायक्रोसॉफ्टला टक्कर .. लवकरच येतोय भारतीय बनावटीचा चॅटजीपीटी

भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’

टोइंग करताना पोलिसालाच पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले; मग सापडले जाळ्यात

सियाने चार निरोगी पिलांना जन्म दिल्यानंतर आता आशा हा चित्ता गर्भवती असल्याचे सांगण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांची नर चित्त्याशी जोडी जमली. चित्त्याचं गर्भधारणेचा काळ हा साधारणपणे ९० दिवसांचा असतो. आशा ही एप्रिलच्या उत्तरार्धात बछडयांना जन्म देणार आहे, असे सांगितले जात आहे. ज्यातऱ्हेने आजच्या चित्त्याने कोणत्याही अडथळ्याविना पिलांना जन्म दिला त्याचप्रमाणे आशा या चित्त्याला सुद्धा अडथळ्याविना पिल्ले होतील अशी आशा आहे. आणि त्यांचा सुद्धा भारतात जन्म होईल.

Exit mobile version