२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले

24 वर्षा नंतर नोकरीसाठी जाग आलेल्या तरुणीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.

२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान नुकतेच एक विधान केले असून त्यामध्ये ‘अनुकंपा’ तत्त्वावर देण्यात येणारी नोकरी ही सवलत असून अधिकार नव्हे, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले. एखाद्या कुटुंबात कमावत्या व्यक्तीचा कंपनीमध्ये आकास्मित मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला संकटातून बाहेर व आर्थिकरूपी मदत व्हावी यासाठी संबंधित कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीमध्ये नोकरी देण्यामागचा हेतु असतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

केरळमधील तरुणीच्या वडिलांचे १९९५ मध्ये ऑन ड्यूटी निधन झाले होते. ते फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड या कंपनीत कामाला होते. त्यावेळी पत्नी नोकरी करत असल्याने कंपनीतर्फे अनुकंपा तत्त्वावर नोकरी नाकारण्यात आली होती. या कंपनीच्या विरोधात महिलेने केरळ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये तीन वर्षापूर्वी वडिलांच्या निधनानंतर २४ वर्षानी या कंपनीकडे अनुकंपा तत्वावर नोकरीची मागणी केली आहे. संबंधित कंपनीने या मागणीला मंजूरी न दिल्याने हे प्रकरण केरळ उच्च न्यालायात पोहोचले होते.

केरळ उच्च न्यायालयाने या महिलेला कंपनीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी. असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. परंतु कंपनीने या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र न्यायाधीश एम.आर.शहा व कृष्णमूरारी यांनी खंडपीठसमोर या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. अनुकंपा तत्त्वावरील नोकरी ही केवळ सवलत असते, तो कोणाचाही सक्तीने अधिकार होऊ शकत नाही, असे स्पष्ट विधान करत या खंडपीठाने केरळ उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवला.

हे ही वाचा 

दुर्दैवी!! गरबा खेळताना मुलगा गेला पाठोपाठ वडीलही मृत्युमुखी

रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार

पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

तसेच ही महिला २४ वर्षा नंतर वडिलांच्या निधनानंतर कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याचा दावा करू शकत नाही. व एखाद्या कुटुंबात कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास घरात कामावणारे कोणी नसल्यास कंपनी माणुसकीच्या भावनेतून अनुकंपा तत्वावर नोकरी कुटुंबातील पात्र व्यक्तीस देऊ शकते. असे विधान न्यायालयाने स्पष्ट केले.

Exit mobile version