अफगणिस्तान, ताजिकिस्तानला बसला भूकंपाचा हादरा

दिल्ली आणि नेपाळ मध्ये सुद्धा सौम्य धक्के

अफगणिस्तान, ताजिकिस्तानला बसला भूकंपाचा हादरा

नुकताच सहा फेब्रुवारीला तुर्कस्तान आणि सिरियामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाने खूप मोठी हानी झालेली असतानाच आज सकाळी भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजून सात मिनिटानी आणि सहा वाजून पंचवीस मिनिटांनी      अफगणिस्तानातील  फैजाबाद येथे भूकंपाचे धक्के जाणवले असून एकूण १८ मिनिटात भूकंपामुळे दोनदा पृथ्वी हादरली आहे.

पहिल्या भूकंपाची तीव्रता ही सहा पूर्णांक सात रिश्टर इतकी होती तर दुसऱ्या धक्क्याला त्याची तीव्रता पाच रिश्टर इतकी मोजली गेली आहे. तर दुसरीकड़े ताजिकिस्तानमधील मुरगोबाजवळ सहा पूर्णांक सात रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. चीनच्या सरकारी दूरचित्रवाणीच्या माहितीनुसार, चीन आणि ताजिकिस्तानच्या सीमेवर स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजून ३७ मिनिटांनी सहा पूर्णांक सात तीव्रतेचा भूकंप जाणवला. या भूकंपानंतर २० मिनिटांनी दोन तीव्र आफ्टरशॉक्स सुद्धा जाणवले आहेत.

हे ही वाचा:

भारत ते गयाना लवकरच थेट विमानसेवा

कोकणचा दौरा की फक्त शिमगाच!

मैदानी चाचणी दरम्यान दुसऱ्या भरती उमेदवाराचा मृत्यु

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला

चिनी भूकंप नेटवर्क यांच्यामते हा भूकंप अधिक शक्तिशाली होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीच्या आत सुमारे दहा किलोमीटर होता. प्रत्येक ठिकाणचे भूकंपाचे माप वेगवेगळे असते. म्हणूनच चीनच्या नेटवर्कने या भूकंपाची तीव्रता वेगळी दाखवली आहे. या आधीच काळ आपल्या देशात दिल्लीमध्ये सौम्य भाकंपाचे धक्के जाणवले तसेच एनसीआरच्या परिसरात सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यानंतर नेपाळ मध्ये सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता हि पाच रिश्टर पेक्षा कमी होती. म्हणून मोठी हानी टळली आहे.

Exit mobile version