27 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरदेश दुनियाअफगाणिस्तानमधील आर्थिक, सामाजिक ढाचा कोसळण्याच्या मार्गावर

अफगाणिस्तानमधील आर्थिक, सामाजिक ढाचा कोसळण्याच्या मार्गावर

Google News Follow

Related

कट्टर इस्लामी अतिरेकी गट तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा केल्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. युरोपियन युनियनचे (ईयू) परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी रविवारी सांगितले की अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकाधिक वाईट होत आहे. “अफगाणिस्तान गंभीर मानवीय संकटाचा सामना करत आहे आणि सामाजिक-आर्थिक ढासळत आहे. ही परिस्थिती अफगाणिस्तान आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते.” त्यांनी ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले.

ते म्हणाले की, “पडझडीच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे गेल्या महिन्यात तालिबानने जाहीर केलेले अंतरिम सरकार, ज्यात एकही महिला सदस्य नाही, हे सरकार अजिबात सर्वसमावेशक नाही. आमच्याकडे असे अहवाल आहेत की महिला आणि मुलींना शाळा आणि विद्यापीठांमधून वगळण्यात आले आहे, जे तालिबानने सुरुवातीला दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात आहे.” बोरेल यांनी पोस्टमध्ये जोडले.

२० वर्षांने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तालिबानने देशाचा ताबा घेतला आहे. तेव्हापासून, अफगाणिस्तानमध्ये, विशेषत: मुली आणि स्त्रिया घाबरलेल्या आहेत. तालिबान अंतर्गत जुने शरियाचे नियम लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. देशात मुलींना शिक्षण घेण्यापासून रोखले गेले आहे. काबुल शहर सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना “घरीच राहा” असे सांगत आहे.

हे ही वाचा:

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

WHO म्हणतंय, हा आहे भारताचा ‘अमृतमहोत्सव’

काय आहे नार्कोटिक जिहाद?

दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

एएफपीच्या ताज्या अहवालात तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, तालिबान अफगाणिस्तानमधील घडामोडींना अंतिम स्वरूप देत आहे. मुलींसाठी लवकरच पुन्हा सुरू शाळा होतील.” मात्र पूर्वीच्या अफगाणिस्तान मंत्रिमंडळातील महिला मंत्रालय देखील बंद करण्यात आले आहे. त्याची जागा “प्रार्थना आणि मार्गदर्शन मंत्रालय आणि सद्गुण आणि उपद्रव प्रतिबंधक मंत्रालयाच्या मंत्रालयाने घेतली आहे. एएफपीनुसार मुजाहिद म्हणाले, “ही पदे अमिरातीच्या कामकाजासाठी महत्त्वाची मानली जातात.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा