अफगाणिस्तान : नो गूड, द बॅड अँड द अग्ली

अफगाणिस्तान : नो गूड, द बॅड अँड द अग्ली

अफगाणिस्तानमध्ये सगळीकडे अनागोंदीची स्थिती आहे. तालिबानने हिंसाचार मोठ्या प्रमाणात सुरु केला आहे. पंजशीर भागात नॉर्दर्न अलायन्स पुन्हा एकदा कंबर कसून तयार आहे. त्यांचा म्होरक्या अहमद मसूद हा या फळीचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये स्थिती काय आहे? आणि भविष्यात काय स्थिती उत्पन्न होऊ शकते यावर भाष्य करणारा हा व्हिडिओ नक्की पहा…

काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कब्जा झाल्याचे चित्र आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधी एक फळी तयार होत आहे. या फळीचे नाव ‘नॉर्दर्न अलायन्स’ असे आहे. अहमद मसूद या अफगाण नेत्याने या फ्लॉचे नेतृत्व स्विकारले आहे. अहमद शाह मसूद या अफगाण राजकारण्याचा हा मुलगा आहे. २००१ सालापासून पहिल्यांदा ‘नॉर्दर्न अलायन्स’चा झेंडा फडकावला गेला आहे. अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागातील पंचशीर भागात ‘नॉर्दर्न अलायन्स’ची स्थापना झाली आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारची विद्युत वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल

तालिबानकडे अमेरिकन शस्त्रास्त्र

अफगाणिस्तानवर कब्जा करूनही तालिबान कंगाल

तालिबानचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने घरोघरी जाऊन लोकांची हत्या करायला सुरवात केली आहे. शोधून शोधून पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी तालिबानचा दहशतवादी काबूलमध्ये फिरत आहेत. कालच डीडब्ल्यू न्यूज नावाच्या एका जर्मन वृत्तवाहिनीच्या एक पत्रकाराला गंभीर इजा पोचवली तर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्याही केली. त्याव्यतिरिक्त अजून एका नातेवाईकाला गंभीर दुखापती झाली. या घटनेनंतर या पत्रकाराने जर्मनीला पलायन केले. त्याचबरोबर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील व्यक्तींनीही जर्मनीत यशस्वीपणे पलायन केले आहे.

Exit mobile version