अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मोठा स्फोट झाला. यात तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारी मारला गेल्याचं म्हटलं जातयं.या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. या घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडाही वाढू शकतो.ही घटना गाजरघड शहरात घडली. गेल्या महिन्यातही तालिबानचा एक प्रमुख नेता मारला गेला होता. या हल्ल्यामागे इसीस खोरासान ग्रुप असल्याचं मानलं जात आहे. याबाबत तालिबानने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गजाघरच्या मशिदीमध्ये एकूण दोन स्फोट झाले. यावेळी जुमाची नमाज चालू होती. मुल्ला मुजीब हे या मशिदीचे मुख्य इमाम होते. त्यांच्या समोरील रांगेत हा स्फोट झाला. हा फिदाईन हल्ला होता आणि त्यात दोन लोक सामील असल्याचे मानले जात आहे. लोक बाहेर पळत असताना दुसरा स्फोट झाला. काही वृत्तानुसार, मुल्ला मुजीब काही तासांपूर्वी हेरातमध्ये एका आर्थिक परिषदेत सहभागी झाल्यानंतर थेट मशिदीत पोहोचले होते. त्यांच्या सचिवाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. लोक बाहेर पळत असताना दुसरा स्फोट झाला. काही वृत्तानुसार, मुल्ला मुजीब काही तासांपूर्वी हेरातमध्ये एका आर्थिक परिषदेत सहभागी झाल्यानंतर थेट मशिदीत पोहोचला होता.
हे ही वाचा:
गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला
सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट
बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की
मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात
याआधी, बुधवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या पोलीस डिस्ट्रिक्ट १७ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी टकोर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सांगितले की, काबूलच्या पोलीस डिस्ट्रिक्ट १७ मध्ये स्फोटके वाहून नेणाऱ्या टोयोटा कोरोला कारचा स्फोट झाला, यात दोन नागरिक ठार झाले आणि तीन जण जखमी झाले.
शिरच्छेद करण्याचे आदेश दिले
मुल्ला मुजीब हे तालिबानच्या सर्वात क्रूर नेत्यांपैकी एक मानले जात असत. मुलींच्या शिक्षणाला आणि मुलींनी घराबाहेर पडण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांनी फतवा काढला होता. त्यात म्हटले आहे – जर कोणी तालिबान राजवटीला विरोध केला किंवा आदेशांचे पालन केले नाही, तर त्याचा शिरच्छेद करणे हीच त्याची शिक्षा आहे. विशेष म्हणजे हा फतवा तालिबानच्या प्रवक्त्याने मुजीबचे वैयक्तिक मत म्हणून फेटाळून लावला होता.